तो जेव्हां तो बाप होतो
आज तिच्या साठी तो चा लेख वाचला.मग ती ही तिच्या जीवनात आलेल्या त्या ला आठवयला लागलि .जीवनात अनेक टप्प्यांवर भेटलेला तो ,कधी चांगला कधी वाईट. कधि ओळखीचा कधी अनोळखी. यातच ती पोहचली एका अन्धारया भयानक रात्रीत. दहा वर्षापुर्वी पावसाळ्यात ती जीवनाला समपवनया साठी सिग्नल नसल्या मुळे थांब लेल्या ट्रेन मधुन उतरून चालायला लागते .पावसामुळे झालेल्या चिखल तुडवत ती शेत ओलांडून रस्त्यावर चालत राहते.थोडं स अंधारल मग ती परत रेल्वे च्या पटरी जवळ येते .आपण कुणा ला दिसणार नाही याचि खबरदारी घेत झाडाच्या आडोशाला बसते. आज ती स्वताला संपवून टाकण्या च जणू ठरऊन च आलेली असते. त्यातच तो हातात कंदील घेऊन पटरी ची रीतसर पाहनी करतो,ईकडे तिकडे बघत येनारया गाडी ला सिग्नल द्यायला जातो. ती त्या आलेंल्या गाडी खाली स्वताला झोकून देते. पण ती फ़क्त जख्मी हाऊन फ़ेकली जाते. आता ति तशीच पटरिवर बराच वेळ पावसात भिजत पडली होती. तो परत आला. हातात कंदील घेऊन पटरीवर फिरत होता. त्याला थोडं पूढे कुणितरी पडलयं अस वाटल. तो थोडा जवळ आला,कंदिल आणखी जवळ नेऊन बघू लागला. आत्ता त्याला ती दिसली.संपुर्ण भिजलेली,जख्मी. त्...