Posts

Showing posts from May, 2019

ती लेकुरवाळी

ताई मावशी म्हणतात तिला सगळे. मध्यम चनिची ,साधि राहनी ,सतत हसरा चेहरा व समोरच्या ला मी आहे अस आश्वासन. खर तर ती ऑल राऊंडर .संस्कृत उत्तम, अध्यात्मिक वाचण भरपुर म्हणजे त्यातील गाढा अभ्यास , सतत रेडी टू हैल्प. तीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण ती कधि डगमगली नाही.ती आम्हा सर्वा साठी एक विद्यापीठ आहे खरंच. कारण ती तीच्या सहज वागण्या तून आपल्या ला शीकऊन जाते ते धेर्य,सहनशीलता,साधेपण,विश्वास ,आणि त्याग मग तो स्वताच्या कुठल्या ही सुविधांचा असो नाही तर ती ने केलेल्या कामाचा.क्रेडिट ती कधि घेत नाही आणि दाखवतर मुलीच नाही. ती उत्तम कौन्सलिग करते.कारण ती जे सागंते ते कुणालाही पटते मग ती सुन असो कि लेक. ती प्रत्येकवेळी असते च ,म्हणजे लग्नं असो बाळानंतपन असो,मरण असो की आजारी व्यक्ती ती असली की घरातली स्री निशींत. आहे ना ताई मग ____ तुझी सावली अशीच आम्हां लेकरानवर राहूदे आम्हा सगळया  लेकराची माय.