Posts

Showing posts from August, 2020

या जलधारा

Image
या जलधारा लावीती वेड मनाला!, खरच आहे ना? ज्यानां पावसाळा खुप आवडतो ते सगळेच माझ्याशी सहमत असणार,हो की नाही?"पावसाळा नेमेची येतो" अस म्हणत  असलो तरी प्रत्येक वेळी तो नव्याने भेटतो अगदी खुप  वाट पहायला लावणारया मित्रा सारखा ,ज्याची आपण खुप  आतुरतेने वाट पाहत असतो अन तो पुन्हा नव्याने वेगळ्याच रूपात भेटतो. या मित्राच्या प्रेमासारख्याच या जलधारा ,कधि हळूवार मनावर फूंकर घालणारया,कधि धोधो बरसून आपल्या मनाचा तळ ढवळणारया ,कधि ब्रेन वाॅश करत मनावरचे मळभ स्वच्छ करणारया.तर कधि मनात इंद्रधनुचे रंग भरणारया.आनंदाचे,आशेचे ,उत्साहाचे ,प्रेमाचे,स्वप्नांचे एक ना अनेक.कित्ती समर्पक आहेना म्हणजे धुसर आकाशात संप्तरंगी इंद्रधनुचे अवतरणे तसेच दु:खी मनावर मैत्रीच्या रंगाची उधळण.तर कधि गच्च भरलेल मन ,मोकळ व्हायला आतुर जसे ढंगाची गर्दि रानावर रित व्हायला तसच काहीस .जलधारा कित्ती कित्ती रूपे ?म्हणजे गवतात दिसणारे दवबिंदू तर कधि पानावरून ओघळणारा सुरेख पारदर्शि मोतिच जणू.कधि टपटपण्याचा मधुर आवाज तर कधि मुक्त बरसणारी बरसात .कधि मंजूळ झरयाचा नाद तर कधि खळखळणारया लाटा.कधि चिंब झालेल्या वाटा तर कधि धुक्य...