या जलधारा
या जलधारा लावीती वेड मनाला!, खरच आहे ना? ज्यानां पावसाळा खुप आवडतो ते सगळेच माझ्याशी सहमत असणार,हो की नाही?"पावसाळा नेमेची येतो" अस म्हणत
असलो तरी प्रत्येक वेळी तो नव्याने भेटतो अगदी खुप
वाट पहायला लावणारया मित्रा सारखा ,ज्याची आपण खुप
आतुरतेने वाट पाहत असतो अन तो पुन्हा नव्याने वेगळ्याच रूपात भेटतो.
या मित्राच्या प्रेमासारख्याच या जलधारा ,कधि हळूवार मनावर फूंकर घालणारया,कधि धोधो बरसून आपल्या मनाचा तळ ढवळणारया ,कधि ब्रेन वाॅश करत मनावरचे मळभ स्वच्छ करणारया.तर कधिजसे ढंगाची गर्दि रानावर रित व्हायला तसच काहीस .जलधारा कित्ती कित्ती रूपे ?म्हणजे गवतात दिसणारे दवबिंदू तर कधि पानावरून ओघळणारा सुरेख पारदर्शि मोतिच जणू.कधि टपटपण्याचा मधुर आवाज तर कधि मुक्त बरसणारी बरसात .कधि मंजूळ झरयाचा नाद तर कधि खळखळणारया लाटा.कधि चिंब झालेल्या वाटा तर कधि धुक्यात हरवलेल्या.
दिवसा वेगळ तस रात्रीच यांच रूप वेगळच म्हणजे सुर्या सवे इंद्रधनुची रांगोळी तर चंद्रा साठी चित्रकाराचा कॅनव्हास
त्यांच अस वेगळ अस्तित्व असत ,त्यांची वेगळी छाप असते .अस काहीस आपलही असत का?आई सोबत आपण आणि आई म्हणून आपल्या लेकरां सोबत आपण .दोन्हीही आपणच पण वेगळी रूप .प्रत्येकाची दृष्टी वेगळी तसच त्यातून दिसणार रूपही वेगळ .पण पांडूरंगा साठी जस त्याचे भक्त म्हणतात "रूप पाहता लोचनि ,सुख झाले हो साजणि" तस फक्त पाऊस यायच्या विचारांनी ,त्या पडणारया जलधारांना स्पर्श करतानां निसर्गवेड्या मनालाही तेच सुख मिळत.आभाळात ढगांची गर्दी झाली की आपलेही मन मयुर नाचायला लागतात.
Comments
Post a Comment