Posts

Showing posts from November, 2020

बोचरा प्रश्न

Image
          सगळी कडे दिवाळीची धुम चालू होती ,दुकाने रस्ते माणसांच्या गर्दीने फुलले होते.    जागो जागी  दिवाळीसाठीच्या वस्तूचीं दुकाने सजली होती.करोना असला तरी आपण तो विसरून दिवाळी साजरी करण्यात त्याच्या भितीला भीक घातली नाही.     रोशनाई ,आकर्षक दिवे,आकाश कंदिल ,कपडे ,फराळ ,वाहन इतकच काय पण सोने चांदी खरेदी करणारे पण भरपूर आहेत , दुकानं आणि रस्त्या वरची गर्दी याची साक्ष देत होती.    या सगळ्यात मी ही दिवाळी साठीचा किराणा (जो एरवी पेक्षा जरा जास्तच होता  ) ,पणत्या ,काहीं मला वर्षभर मदत करणारयां लोकां साठी मिठाई (कामवाली,कचरेवाला,दुधवाला,अमावस्वया मागणारी बाई,गुरखा ,पोस्टमन) व इतर सामान ज्या मुळे माझी ट्राली गच्च भरली होती, तसेच बरयाच जणांचे सामान भरपूरच होते.                त्यात एक सत्तरी चे आजोबा ,पांढर धोतर ,पिळदार मिश्या,अंगाने धिप्पाड असे जणू कष्टाने कमावलेली शरिरयष्टी.     आजोबांच्या  बास्केट मधे  मोजून तिन/चार वस्तू तेलाची कॅन ,साखर ,मुरमुरयाच पॅकेट,शेंगदाणे ,डा...