बोचरा प्रश्न

 

        सगळी कडे दिवाळीची धुम चालू होती ,दुकाने रस्ते माणसांच्या गर्दीने फुलले होते.

   जागो जागी  दिवाळीसाठीच्या वस्तूचीं दुकाने सजली होती.करोना असला तरी आपण तो विसरून दिवाळी साजरी करण्यात त्याच्या भितीला भीक घातली नाही.

    रोशनाई ,आकर्षक दिवे,आकाश कंदिल ,कपडे ,फराळ ,वाहन इतकच काय पण सोने चांदी खरेदी करणारे पण भरपूर आहेत , दुकानं आणि रस्त्या वरची गर्दी याची साक्ष देत होती.

   या सगळ्यात मी ही दिवाळी साठीचा किराणा (जो एरवी पेक्षा जरा जास्तच होता  ) ,पणत्या ,काहीं मला वर्षभर मदत करणारयां लोकां साठी मिठाई (कामवाली,कचरेवाला,दुधवाला,अमावस्वया मागणारी बाई,गुरखा ,पोस्टमन) व इतर सामान ज्या मुळे माझी ट्राली गच्च भरली होती, तसेच बरयाच जणांचे सामान भरपूरच होते.                त्यात एक सत्तरी चे आजोबा ,पांढर धोतर ,पिळदार मिश्या,अंगाने धिप्पाड असे जणू कष्टाने कमावलेली शरिरयष्टी.

    आजोबांच्या  बास्केट मधे  मोजून तिन/चार वस्तू तेलाची कॅन ,साखर ,मुरमुरयाच पॅकेट,शेंगदाणे ,डाळ्या ,रवा ---

   आजोबांच बिल झाल व ते जाता जात आमच्या कडे बघून ,"झाली शेतकरयाची दिवाळी,त्याला कुठला बोनस मिळतोय?." या प्रश्नाने एकदम घशात कोरड पडली. बोचराच होता तो प्रश्न.          खरच वर्षभर कष्ट करूनही  ना पगार वाढ,ना बढती ना महागाई भत्ता ,जिथे आपला देश "शेती प्रधान देश " म्हणून ओळखला जातो ,तिथे  त्या अन्नदात्या ,जगाच्या पोशिंदयाची अशी अवस्था. आत्महत्याच अखंड चालणार सत्र.

   विदारक परिस्तिथी,शेतीविषयक धोरणां मधील तृटी, त्या शेतकरया साठीच्या योजना बाबूशाहीच्या विळख्यात त्यात हवामानातले अस्थीर बदल ,अवकाळी पाऊस तर कधी विना पावसाचा पावसाळा ,मग कधि अति उत्पन्नाने घसरलेल्या शेती मालाच्या किंमती,कधी बोगस बियाणे ,रोगाचा प्रादूर्भाव, कर्जाचा विळखा हे सगळेच त्याच्या गळ्याशी घट्ट आवळल जात आणि गुदमरणारया श्वासाला तो कायमचा मुक्त करून टाकतो.

    किती विशमता ?सहावा वेतन आयोग ,सातवा वेतव आयोग.

    पण खर रक्ताच पाणी करणारयांच्या श्रमाला ना प्रतिष्टा ना मोल .

     खरच बुध्दी मग ती सत्कार्य करायला लावणारी,कमावयला शिकवणारी(मग भ्रष्टाचार करणारया ची कि मल्ल्या ,निरव मोदी सारखी फसवणूक करणारयांची)  मोठी का?

   हा विषमतेचा पडदा कधी उठणारच नाही का?

ही दरी अशीच वाढतच राहणार?

   कि प्रत्येकाच्या श्रमाच मोल त्याला मिळणार?

 इडा पिडा टळून "बळीराजाच" राज्य पुन्हा येणार?

   येणार ना!

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल