Posts

Showing posts from February, 2021

बालपणी चे रंग न्यारे ,उधळूया संगे सारे

Image
    बालपणीचे न्यारे रंग बघून वाटल किती छान असत ना  बालपण आणि बालमन,निरागस , निश्चिंत  .    मधे मधे छान बालपणीची आठवण देणारे व्हिडीओज व्हाॅट्सअप वर येत असतात,तेव्हाचे खेळ ,तो स्वस्त पण मस्त खाऊ ,ते मित्रां सोबत निवांत क्षण.    सोबत आत्ता हिरावलेल बालपण , मुलांच्या विश्वात शिरलेली स्पर्धा, सतत डोळ्यांसमोर असलेल स्क्रिन या सर्वांचा या मुलांवर होणारा परिणाम सांगणारे लेख.   पण जस करोना नंतर लाॅकडाऊन थोड शिथील झाल आणि पालकांनाही मुलांच्या कोंडमारयाची ,त्यांच्या भावनिक कोंडीची जाणीव झाली तस पालक ही मुलांना थोडी मोकळीक दयायला लागले आणि पुन्हा किलबिलाटा ने जश्या शाळा बहरला लागल्या ,तसेच रस्ते, बागा ,मैदान ही मुलांनी बहरायला लागली.     जिथे खेळायला मैदान आहेत तिथे मुल हमखास दिसतातच खेळतांना . बरयाच महिन्या नंतर मित्रांना भेटलेले हे संवगडी ऐकमेकांच्या सहवासाला आसुसलेले सतत सोबत राहू इच्छीता त , मग कितीही वाद होत असले  त्यांच्यात तरी एखादा नमत घेऊन पुढे खेळ सुरू---- अगदी जेवणाची वेळ टळली तरी भुकेची जाणिव नाही ,ना घराची ओढ,न आईचा धाक, न अभ्...