बालपणी चे रंग न्यारे ,उधळूया संगे सारे
मधे मधे छान बालपणीची आठवण देणारे व्हिडीओज व्हाॅट्सअप वर येत असतात,तेव्हाचे खेळ ,तो स्वस्त पण मस्त खाऊ ,ते मित्रां सोबत निवांत क्षण.
सोबत आत्ता हिरावलेल बालपण , मुलांच्या विश्वात शिरलेली स्पर्धा, सतत डोळ्यांसमोर असलेल स्क्रिन या सर्वांचा या मुलांवर होणारा परिणाम सांगणारे लेख.
पण जस करोना नंतर लाॅकडाऊन थोड शिथील झाल आणि पालकांनाही मुलांच्या कोंडमारयाची ,त्यांच्या भावनिक कोंडीची जाणीव झाली तस पालक ही मुलांना थोडी मोकळीक दयायला लागले आणि पुन्हा किलबिलाटा ने जश्या शाळा बहरला लागल्या ,तसेच रस्ते, बागा ,मैदान ही मुलांनी बहरायला लागली.
जिथे खेळायला मैदान आहेत तिथे मुल हमखास दिसतातच खेळतांना . बरयाच महिन्या नंतर मित्रांना भेटलेले हे संवगडी ऐकमेकांच्या सहवासाला आसुसलेले सतत सोबत राहू इच्छीता त , मग कितीही वाद होत असले त्यांच्यात तरी एखादा नमत घेऊन पुढे खेळ सुरू---- अगदी जेवणाची वेळ टळली तरी भुकेची जाणिव नाही ,ना घराची ओढ,न आईचा धाक, न अभ्यासाची भिती.
परस्परांच ऐकणारे ,सोबतीन काय काय करणारे ,वयाचे वा इतरही भेद विसरून एकीच्या भावनेने ऐकमेकात गुंतलेले सारे बघुन वाटतच मोठ्यांना नाही का अस करता येत?कााााा?
नाहीच मोठे वयाने ,शरिराने मोठे होतात ,दिसतात पण या वाढलेल्या वयात मनं मात्र कांहीचीच मोठी होतात व अनेकांची कोती -- मग कसल निस्वार्थ ,निसपृह वागणं,सगळ्यांनी आपल्या भोवती आखलेली ,अदृश्य कुंपण__________
मुल आपल्याला बालपणाच्या गोड आठवणी तर देतच असतात पण च्यांच्या बरयाच कृतीत आपल्या साठी शिकवण ही असते.
या फोटोतल्या दोन मैत्रीणीं शी माझी ओळख 7/8 वर्षा पासून ,माझ्या ऐकटे पणात किंवा माझी मुलगी त्यांच्यात बघन्यान माझी त्यांची विशेष गट्टी.त्यांच मागे मागे घुटमळण ,प्रश्न विचारून भांडावून सोडनं अस सगळ .
आत्ता त्यांच्यात आणखी दोघींची भर पडलीय.
त्या एकमेकींशी जे वागतात त्यात ऐकीची घट्ट बीज रोवली जात आहेत.मग खेळायला येण्या आधि ऐकमेकींना बोलवण असो,काय खेळायच? , काय करायच या पासून तर थेट ऐकमेकींन मधे झालेले गैर समज समोरा समोर मिटवण असो.
आत्ता त्यांनी ओपन स्पेस मधे बाग करायच मनावर घेतल मग काय त्या ऐकदम जिद्दीला पेटल्या फार काही नाही तरी झाडां खाली स्वच्छता केली त्या साठी गवत काढल ,काटेरी झाड काढलीत इतकच काय पण शेण आणून सारवलही.पैसे गोळा करून झोके बांधले , एकाच झाडा खाली नाहीतर काल परवाच त्यांनी तिसरया झाडाखाली ही जागा स्वच्छ करून झोका बांधला.
त्यांच्या जीद्दीमुळे बरीच मुल खेळायला यायला लागली ,छोटी मोठी सगळीच झोक्यांचां आनंद घ्यायला लागली .
त्यांनी नंतर चित्रकलेची स्पर्धा घेतली, कधी कधी सायकल ची स्पर्धा ,पुढे बरेच प्लन्स् आहेत त्यांचे . स्वप्न मोठी आहेत ,पण ठिकच आहे जेवढी मोठी स्वप्न तेवढी जिद्द आणि divotion, dedication.
त्यांच्या या जिद्दीला सलाम ,खरतर बरेच वाद झाले ,मोठ्यां पर्यंत वाद गेले पण या पठ्ठ्या निराश झाल्या नाहीत , कोणी साथ दिली नाही तरी त्यांच हे काम अजुनही चालुच आहे.
नाहीतर आपण मोठी मंडळी कोणाला काही पडली नाहीय मग आम्ही च का करायचय ,सगळेच तर खेळतात .
तर अश्या बालपणीच्या गोड , रंगीबेरंगी रंगात सगळ्यांना रंगता आले तर _______
Comments
Post a Comment