Posts

Showing posts from September, 2019

दुरितांचे तिमीर जावो.

     दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वर्धम सुर्ये पाहो||     किती सुदंर आहे ना ,ग्यानेश्वरांनी पसायदानात लिहीलेल ,माडंलेल हे. खरतर विचार,लिखाण या गोष्टी सुदंर आहेत तर त्या आपल्या सगळ्या साठी महत्वाच्या आणि आपल्या सर्वांच आयुष्य सुदंर करणारया.     सारयांनचा  निर्माता ताे परमपिता परमात्मा ,एकच आहे हे आपण ऐकतो, म्हणतो पण मानत नाही का?      शाळेत असतांना म्हटली जाणारी प्रतिग्या ,"सारे भारतीय माझे बांधव आहेत,--------",किंवा शुभम करोती ,कल्याणम म्हणनारे आपण आपल विश्व इतक संकूचित करून टाकतो की आपल्या उंबरयाच्या बाहेर आपल कुणीच नाही असच वागत असतो.          आपल्या कातडीचा रंगच तो काय वेगळा पण सारेच मानव म्हटले जाणारे दोन पायाचे प्राणी हाडामासाचे ,अंगात लाल रक्त ल्यायलेले,नाक कानाचा आकार वेगळा असला तरी सामान्य पणे त्यांची संख्या प्रत्येकात सारखीच.      तरीही  किती भेदभाव रंगाचा, जातीचा,धर्माचा ,देशाचा. प्रतेक जण ज्या कुठल्या देवाला मानतो तोही सर्वांवर प्रेमच तर करायला शिकवतो,माफ करायला शिकवत...

मायाजाल

   आपल्या देशात सतत कुठल्यानकुठल्या नीवडनुका चालू असतात .त्यात येरवी कधीही तोंड न दाखवणारे मतदार राजाची मनधरनी करतात,पाय धरतात.    त्यात भुलवणारी ,खंडीभर आश्वासन देणारी ,स्वप्न दाखवणारी  भाषण देतात.कधी पैसे , वस्तू,साड्या ,कायम बेहोश करण्या  साठी दारू  , अश्या अनेक प्रलोभनांनी आपल अनमोल मत माती मोल भावात मिळवतात.    पूर्वी पूरूषांना बाटलीत उतरवल की अख्ख घर एकालाच मत द्यायच ,आत्ता बायका स्वतंत्र विचार करायला लागल्यात.या 50% मतदार असणारया भाबड्या  बायकां साठी उमेदवार नवनवे फंडे आजमावू लागलेत.   म्हणजे उमेदवार पूरूष असेल तर त्याची अर्धांगीनी किंवा स्वत:उमेदवार असणारी महीला या बायकां साठी हळदीकुंकू, गरबा,विविध स्पर्धां वा कार्यक्रमांचे आयोजन करते.   या महिलांचे सुप्त गुण जोपासले जातात ,त्यांना एक व्यासपिठ मिळत.मग त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करणारया व्यक्ती त्यांच्या साठी महान वा उत्तम ठरतात.      आपली कुल्फ्या दाखवून बोळवण केली जातेय हे कीत्तेकींना कळतच नाही व कळत त्यांना वाटत मला महत्व मिळतय ते कशा साठी का अस...