दुरितांचे तिमीर जावो.

     दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वर्धम सुर्ये पाहो||
    किती सुदंर आहे ना ,ग्यानेश्वरांनी पसायदानात लिहीलेल ,माडंलेल हे. खरतर विचार,लिखाण या गोष्टी सुदंर आहेत तर त्या आपल्या सगळ्या साठी महत्वाच्या आणि आपल्या सर्वांच
आयुष्य सुदंर करणारया.
    सारयांनचा  निर्माता ताे परमपिता परमात्मा ,एकच आहे हे आपण ऐकतो, म्हणतो पण मानत नाही का?
     शाळेत असतांना म्हटली जाणारी प्रतिग्या ,"सारे भारतीय माझे बांधव आहेत,--------",किंवा शुभम करोती ,कल्याणम म्हणनारे आपण आपल विश्व इतक संकूचित करून टाकतो की आपल्या उंबरयाच्या बाहेर आपल कुणीच नाही असच वागत असतो.
         आपल्या कातडीचा रंगच तो काय वेगळा पण सारेच मानव म्हटले जाणारे दोन पायाचे प्राणी हाडामासाचे ,अंगात लाल रक्त ल्यायलेले,नाक कानाचा आकार वेगळा असला तरी सामान्य पणे त्यांची संख्या प्रत्येकात सारखीच.
     तरीही  किती भेदभाव रंगाचा, जातीचा,धर्माचा ,देशाचा.
प्रतेक जण ज्या कुठल्या देवाला मानतो तोही सर्वांवर प्रेमच तर करायला शिकवतो,माफ करायला शिकवतो.
    आज जगातली अशातंता वाढत चाललीय . जितकी globalwarming ची चर्चा सार जग करतय तशीच किंवा त्यापेक्षा जास्तच चर्चा किंवा उपाय सर्वधर्म समभाव, सर्व समावेशकता या बद्दल झाली पाहीजे.
    सर्व एकच आहोत आणि आपल्याला प्रेम आणि शांतीचा वर्सा मिळालाय ज्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहीजे.
ती झाली तर आपण ऐक कुटूंब म्हणून प्रेमाने राहू मग ना कुठली भांडण ना लढाया.
    म्हणजे हे विश्व स्वधर्माचा म्हणजे प्रेमाचा सुर्य पाहील आणि दूरितांचे तिमीर या विश्वातून समूळ नष्ट होईल.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल