मायाजाल

   आपल्या देशात सतत कुठल्यानकुठल्या नीवडनुका चालू असतात .त्यात येरवी कधीही तोंड न दाखवणारे मतदार राजाची मनधरनी करतात,पाय धरतात.
   त्यात भुलवणारी ,खंडीभर आश्वासन देणारी ,स्वप्न दाखवणारी  भाषण देतात.कधी पैसे , वस्तू,साड्या ,कायम बेहोश करण्या  साठी दारू  , अश्या अनेक प्रलोभनांनी आपल अनमोल मत माती मोल भावात मिळवतात.
   पूर्वी पूरूषांना बाटलीत उतरवल की अख्ख घर एकालाच मत द्यायच ,आत्ता बायका स्वतंत्र विचार करायला लागल्यात.या 50% मतदार असणारया भाबड्या  बायकां साठी उमेदवार नवनवे फंडे आजमावू लागलेत.
  म्हणजे उमेदवार पूरूष असेल तर त्याची अर्धांगीनी किंवा स्वत:उमेदवार असणारी महीला या बायकां साठी हळदीकुंकू, गरबा,विविध स्पर्धां वा कार्यक्रमांचे आयोजन करते.
  या महिलांचे सुप्त गुण जोपासले जातात ,त्यांना एक व्यासपिठ मिळत.मग त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करणारया व्यक्ती त्यांच्या साठी महान वा उत्तम ठरतात.
     आपली कुल्फ्या दाखवून बोळवण केली जातेय हे कीत्तेकींना कळतच नाही व कळत त्यांना वाटत मला महत्व मिळतय ते कशा साठी का असेना, मी यात खुष आहे.
     आपल्या ताकदीची जाणीव होऊद्या बायांनो .किती दिवस ,किती काळ तूम्ही कुपमंडूका सारख्या आपल्या भोवतीच्या छोट्याश्या डबक्यातच खूष राहणार आहात . बाहर भी झांकलो वरना तो अंधेरे और गेहरे होते जायेंगे.
      माझ घर, माझा आनंद ,माझ बजट या माझ्या तून बाहेर येवून आपल भल कश्यात आहे याचा विचार करा ,अभ्यास करा.
         क्षणीक मोहात पडून अडकू नका या मायेच्या जाळ्यात.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल