कँन्डल मार्च पून्हा!
गेले काही दिवस बळी गेलेल्या लेकींच्या सन्मानार्थ कि त्यांना श्रध्दांजली म्हणून गावोगावि कँन्डल मार्च काढले जातायत . आपल्या संवेदना व्यक्त करायचा हा मार्ग आपण अवंलबला आहे बस तेवढच ? पण आपल्याला काही प्रश्न पडत नाहीत का कधी की या गोष्टी सातत्याने होत असतात .कधी स्री म्हणून तर कधी अल्प- संख्याकं म्हणून तर कधी गरिब दुबळी लोक या अश्या अत्याचाराला बळी पडतात. याची कारण प्रत्येका च्या ठिकाणी वेगवेगळी असतात पण अस करणारे मात्र ताकदिने ,पैस्याने, मोठे असतात अन त्यांच्या लेखी ते जे करताहेत तेच योग्य आहे. ईथेच आपली एकंदरीत समाजव्यवस्था जबाबदार ठरते. मुली,सूना किंवा बायको या एक स्री म्हणून असल्या अत्याचाराला बळी पडतात, कधी तीने दिलेला नकार पचवता आला नाही म्हणून तर कधी हूंडा कमी पडला म्हणून तर कधी मूल होत नाही म्हणून तर कधी स्वयंपाक केला नाही,दारूला पैसे दिले नाही ,चारीत्र्यावर संशय अस कुठलही कारण चालत तीचा जीव घ्यायला . ...