कँन्डल मार्च पून्हा!
गेले काही दिवस बळी गेलेल्या लेकींच्या सन्मानार्थ कि त्यांना श्रध्दांजली म्हणून गावोगावि कँन्डल मार्च काढले जातायत . आपल्या संवेदना व्यक्त करायचा हा मार्ग आपण अवंलबला आहे बस तेवढच ?
पण आपल्याला काही प्रश्न पडत नाहीत का कधी की या गोष्टी सातत्याने होत असतात .कधी स्री म्हणून तर कधी अल्प- संख्याकं म्हणून तर कधी गरिब दुबळी लोक या अश्या अत्याचाराला बळी पडतात. याची कारण प्रत्येका च्या ठिकाणी वेगवेगळी असतात पण अस करणारे मात्र ताकदिने ,पैस्याने,
मोठे असतात अन त्यांच्या लेखी ते जे करताहेत तेच योग्य
आहे.
ईथेच आपली एकंदरीत समाजव्यवस्था जबाबदार ठरते.
मुली,सूना किंवा बायको या एक स्री म्हणून असल्या अत्याचाराला बळी पडतात, कधी तीने दिलेला नकार पचवता आला नाही म्हणून तर कधी हूंडा कमी पडला म्हणून तर कधी
मूल होत नाही म्हणून तर कधी स्वयंपाक केला नाही,दारूला पैसे दिले नाही ,चारीत्र्यावर संशय अस कुठलही कारण चालत तीचा जीव घ्यायला . आजकाल समाज माध्यम् ,आणि सोकाॅल्ड मिडीया सगळ्यांनाच त्या पिडीतेचा खुप पुळका येतो, सतत तेच तेच चघळल जात .

एक प्रकरण लोक विसरतात तोवर दुसरीचा बळी जातो पुन्हा कुठल्या तरी सरकार,जात , धर्माविरूध्द वातावरण तयार होत(केल जात).अनेक चर्चा ,पुन्हा मोर्चे, तिला न्याय मिळावा म्हणून आंदोलनं .
आपल्या संवेदनशिलतेचा देखावा करून झाला कि आपली जबाबदारी संपली---------------?
कुठे त्या गोष्टी घडूच नये म्हणून मी काय करायला हव,माझ्या आजूबाजूला काय शिजतय म्हणजे मुलांच्या मनात काय रूजतय ,त्याचे संस्कार त्याला कस घडवतायत याचा विचार करायला नको का?
हि विकृती, हो विकृतीच अचानक रात्रितून जन्माला येत नाही किंवा बलात्कारपिडीतेचे कपडे बघून ते कृत्य (अस काहि सुध्न्य लोकांना वाटत)घडत अस नाही.याला उदाहरणं आधि घडलेल्या अनेक घटना आहेत. लहान मुली ,म्हातारया स्रिया,आई, बहिण,सुन,वहिणी ,शिश्या ,कलीग अशा सगळ्या वासनेच्या बळी ठरल्यात. नात ,वय ,राहण याचा कसलाही संबध नाही.
पण अस काय करायला हव ज्या मुळे ती सुरक्षीत राहील.काय घरात राहून? हो ! काहींच असही म्हणन असत ,तिच्या साठी सातच्या आत घरात असा नियम कित्येक दशक झाले लावण्यात आला आहे.पण ती तर घरातही सुरक्षीत नाही तेव्हा काय तिच्या साठी नियम ,बंधन घालून हे थांबेल ?
इथे जी मानसीकता तिच्या साठी घातक ठरते त्यात बदल व्हायला नको ?
काल घटस्थापना झाली ,देवीच्या विविध रूपांची नऊ दिवस पूजा होईल.तिची रूप स्त्रियांनी धारण करावी अस तर देवी ला सांगायच नसेल ना ?
कि, " अनंतकाळाची माता" , "शयनेशू रंभा ,भोजेशू माता,कर्मेशू दासी" इथेच आपण अडकून राहणार आहोत.
आपल्या देशात जितकी देवाची भक्ति केली जाते तितके जास्त स्त्रियांवर अत्याचारही होतात म्हणजे इतर ठिकाणी ही ते होतातच ,पण आपल्या देशात पत्नि,सुना यांना अधिक सहन- शिल, बंदिस्त राहावे लागते. हा नियम संपूर्ण समाज त्यांच्यावर लादत राहतो आणि तसा तो योग्य आहे असही मानलच जात.याला कुठल्या कोर्टात दाद मागता येत नाही.
अनेक जबाबदारया पार पाडणारया तिला हक्क मात्र कागदावरच असतात.
सन्मान प्रत्यक्षात देण आणि तिच स्वतंत्र अस्तित्व मान्य करण या गोष्टी जरी भारतीय समाजमनात रूजल्या तर काही टक्के आत्महत्या थांबतील, घरघुती हिंसा कमी होईल .
पुढे तीच्या " नो " म्हणजे "नो" ला पुरूषांच्या मनावर बिंबवल गेल तर काही तिच्या मना विरूध्द होणारया संभोगापासून सुटतील .
पुढे तिच्या प्रगतीची ईर्शा वाटणारया ,तिचा नकार न पचवू शकणारया आणि यातच स्वत: चा पुरूषी अंहकार दुखावला गेला म्हणून अँसीड हल्ला किंवा तिला इतर मार्गाने हानी पोहचवणारयां साठी सामाजीक जडणघडणीत , एकंदरीत समाजातच स्त्रि म्हणजे काही दुय्यम दर्जाची आणि तिची प्रगति पुरूषत्वाला आव्हान देणारी असा गैर समज पुसणे अतिशय महत्वाचे ठरेल.
आत्ता वासना हि गरज,प्रवृत्ती , विकृती याचा योग्य विचार करून त्या दृष्टीने सर्वच स्थरावर विचार व उपाय करणे गरजेचे आहे ,कालच परत या वासने पाई एका अभ्यासू मुलीचा बळी गेला व सोबत तिन भांवडही आपला जीव गमाऊन बसलीत.
बरयाच मुली ,स्त्रिया या आपल्या कडे असणारया रेडलाईट एरीयात सेवां देणारयं मुलीं - स्त्रियां मुळे वाचतात अस म्हणायला हरकत नाही Thanks to them.कारण व्यवसाय म्हटला तरी तो वेदनादाई व समाजात बदनाम असणारा असा आहे.
मग काय बर करता येईल? याचा विचार व कृती करणे अधिक गरजेचे आहे . कायदा ,शिक्षा या गोष्टी या घटना थांबवू शकल्या नाहीत .
व्यसनांनवर आळा घालण आणि अध्यात्मिकता रूजवन हे बरच परिणामकारक ठरू शकते.
बरयाच घटनांन मध्ये अति व्यसनां मुळे माणसातली सदसद विवेक बुध्दि मारली जावून ही सैतानि कृत्य झालीत.
अध्यात्म संयम , पवित्रता , मानवता या गुणांची माणसात पेरणी करत, रूजवत .
तेव्हा बघुया का हे करून कि ???????
फुलन देवी जन्माला यावी लागेल नराधमांच शिरसंधान करायला कालीच रूप घेऊन.
Comments
Post a Comment