आजोबा , "माय बाप"

         " घेता का याला जरा,मी तेवढी स्लीप भरतो." एक सत्तरीतले आजोबा दोन वर्ष वयाच्या नातवाला बाजूला उभ असलेल्या व्यक्ती कडे देत म्हटले.       
     सही करताच त्यांनी   त्याला परत आपल्या कडेवर घेतले.ते बाळ झोपेतून नुकतच उठल्या मुळे अधिकच रडत होते. तस त्याच कौतूक करत आजोबा म्हणाले तो फार शहाणा आहे,शांत आहे .माझ्या अंगावर आहे,तेवढ्यात त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आले तसा संदर्भ देत ते सांगू लागले ,"यानां माहीत आहे त्याची आई सहा महीन झाले निघून गेलीय."
      हा सगळा संवाद आपसूकच माझ्या कानावर पडत होता आणि नकळत मी त्या बाळाच्या आईचा विचार करू लागले ,म्हणजे नक्की काय झाल असेल? ती एवढ्या छोट्या बाळाला सोडून का गेली ?
           त्यात त्यांच्या घरात दुसर कुणीच नसेल का त्याला सांभाळणार कारण झोपलेल्या बाळाला ते सोबत घेऊन आले होते.
       खरतर येरवी एखाद्या आईला बाळाला घेऊन काम करायची हतोटीच असते पण आज हे आजोबा त्याचे माय आणि बाप झालेत.

Comments

Popular posts from this blog

आंधळा राजा ,"मतदार" आणि धूर्त लबाड लोकसेवक

We are the dumping ground for all that world can reject

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल