सुदंर जग
गेल्या कित्येक महिन्यांन पासून संपूर्ण जग करोनाच्या दहशती खाली श्वास घेतय.अनिश्चितता,भय कुणाला मरणाचे तर कुणाला जगन्याचे साधन गमावण्याचे भय. कुठे पोटाला अन्न मिळवण्याची चिंता तर कुठे आपल्या पासून दूर असलेल्या माणसांची चिंता. असा सगळा गोधंळ माजलाय. अस सगळ माणसांच्या विश्वात आहे,पण पशूपक्षी आत्ता माणसांना घरात बसवून मुक्त संचार करताहेत. अनेक देशातिल प्राणी येरवी जंगलात किंवा प्राणीसंग्राहलयात दिसणारे रस्त्यांवर दिसताहेत. खरतर आपणच त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलय .असो पण या भयानक आजाराने मानवाला त्याच्या सीमा ठरवून त्यातच राहणे सक्तिचे केले आहे. तर अश्या मानवाची लुडबूड नसलेल्या सुंदर पशूपक्ष्यांच्या सुदंर जगाचा अनोखा नजारा घरात राहूनच,खिडक्यांची तावदान किलकिली करून बघता येतोय,अनुभवता येतोय. सकाळच्या निरभ्र आकाशात आपल्या सोनेरी किरणानीं सजलेला उगवता केशरी सुर्य आपल्या आवडत्या माणसां सोबत वाफाळलेल्या चहाच्या घोटागनीक अनुभवन्या सारखे सुख घरातच ,आहे त्या डेस्टीनेशनला घेता येतेय , मग कुठला स...