सुदंर जग

  गेल्या कित्येक महिन्यांन पासून संपूर्ण जग करोनाच्या दहशती खाली श्वास घेतय.अनिश्चितता,भय कुणाला मरणाचे तर कुणाला जगन्याचे साधन गमावण्याचे भय. कुठे पोटाला अन्न मिळवण्याची चिंता तर कुठे आपल्या पासून दूर असलेल्या माणसांची चिंता. असा सगळा गोधंळ माजलाय.
     अस सगळ माणसांच्या विश्वात आहे,पण पशूपक्षी आत्ता माणसांना घरात बसवून मुक्त संचार करताहेत.
     अनेक देशातिल प्राणी येरवी जंगलात किंवा प्राणीसंग्राहलयात दिसणारे रस्त्यांवर दिसताहेत. खरतर आपणच त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलय .असो पण या भयानक आजाराने मानवाला त्याच्या सीमा ठरवून त्यातच राहणे सक्तिचे केले आहे.
   तर अश्या मानवाची लुडबूड नसलेल्या सुंदर पशूपक्ष्यांच्या सुदंर जगाचा अनोखा नजारा घरात राहूनच,खिडक्यांची तावदान किलकिली करून बघता येतोय,अनुभवता येतोय.
           सकाळच्या निरभ्र आकाशात आपल्या सोनेरी किरणानीं सजलेला उगवता केशरी सुर्य आपल्या आवडत्या माणसां सोबत वाफाळलेल्या चहाच्या घोटागनीक अनुभवन्या सारखे सुख घरातच ,आहे त्या डेस्टीनेशनला घेता येतेय , मग कुठला सनसेट पाॅईंट अन सनराईज पाॅईंट सगळे फिके.
       सकाळी आँफिसला वा शाळेत जाणारयांची घाई नाही तेव्हा सकाळ मोगरया च्या दरवळारया  सुगंधा सोबत अनेक पक्षांच्या वेगवेगळ्या सुरावटींनी रम्य होतेय.
     किती ते पक्षी अन त्यांचे रंग,आवाज या आधि अँनिमल प्लॅनेटवरच बघितले .
      मस्त सगाळ्यात उंच झाडाच्या उंच फांद्यावर यांची भरलेली शाळा इन्जाॅय करतेय.
     कुणी जोडीन तर स्वच्छंदी असलेली पाखर एकटी एक एक करत येऊन बसत होती.
        बुलबुल ,टिटवी ,कोकीळ, भरद्वाज,तितर ,कबूतर चिमण्या त्या तर कित्ती कित्ती रंगाच्या अन साईज च्या .     एक काळी नि पांढरया रंगाची वर काळा नि खालून पाढरा रंग त्यात वरच्या पांढरया अंगावर एक एक पांढरा पट्टा जनू काळ्या पांढरया काॅम्बीनेशनची फँशन यांच्या कडे बघुनच आली असेल.
  यांची जुगल बंदी चालू असते. भरद्वाजा चा भारदस्त आवाज त्याच्या आकाराला साजेसा असाच असतो बहुतेक आपल्या जोडीदाराला रिजवन्या साठीच असतो जणू.
    काळी छोटुकली चिमणी पण तिची चोच मात्र मोठ्ठी धारदार असते अन आवाजही खुप करतात बाई गोधंळ्या सारखा.
    पिवळी अन करड्या रंगाची चिमणी हंमिग बर्ड असावि का ? कारण ही पण फुलांमध्ये आपली लांब चोच घुसवून स्ट्रा प्रमाणे रंस शोषत असते. कधी वेडा राघू आपल्याच तंद्रीत गिरट्या घेत असतो.
       लव्ह बर्ड्स सारख्या पिवळ्या चिमण्या पण दिसतात कधिकधि. आपल्या चिमण्या पण भरपूर दिसताहेत सध्या.
  त्यांना अवेलेबल करून दिलेल्या घरट्यां मध्ये संध्या दोनाचे चार झालेले दिसतात.
    हो पण त्यतल्या एका घरट्यावर मांजरीने आक्रमण केले अन पिल्ल पंख फुटन्या आधिच-------
  खुप आक्रोश करणारा चिवचिवाट झाला इतर पक्षीही जीवाच्या आंकाताने ओरडू लागले पण नाही वाचवता आली पिल्ल मांजरी पासून .मला खुप वाईट वाटल ,मी जरा अजून सुरक्षीत आणि उंच जागी तो घरट्या साठीचा बाॅक्स ठेवायला हवा होता. पण आत्ता त्यांनीच नव्या जागी संसार माडांयला घेतलाय.
     आज एका भरद्वाजा पेक्षा मोठ्या आणि हार्नबिल सारखी  चोच असलेल्या करड्या रंगाच्या पक्ष्यावर लक्ष गेल बहुतेक स्थलांतर करणारयां पक्षां पैकी  असावा.
     आत्ता तर त्यांची अन माझी ओळखही  झालीय कारण पाणि टाकताना ंपिटुकली काळी चिमणी न घाबरता झाडांच्या आळ्यात मस्त डुंबत असते.पंख पसरवते ,फडफडते ,पाण्याची मज्जाच घेत असते. मी बागेत असले तरी भरद्वाज कधी झाडावर तर कधि खाली काही तरी शोधून खात असतात. बुलबुल  आणि कोकीळ अंजीर आणि  चिकू चा आस्वाद घेत असतात.
    चिमणा बाई कधी ठेवलेल्या फिडर मधून कानोसा घेत बाजरी चे दाणे खातात तर कधि हळूच पाण्यात चोच बुडवून पाणि पितात.         
   मी त्यांचा विश्वास कमावलाय याचा भारीच आनंद होतो ,बागेतल्या कामा बरोबर या सुदंर जगाचा आनंद घेता येतो त्यांच्यातल म्हणून जगता येत नसल तरी त्याच्या सोबत जगायला मिळत याचा आनंद होतो.
   
   

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल