मी जबाबदार

सुंदर ,योग्य शिर्षक आणि मजकुरही . आपण नागरिक म्हणून शिस्त पाळली तर अनेक समस्या कमी होतिल किंवा समस्या निर्माणच होणार नाही.तुम्ही म्हणाल हे कस ? आपली लोक संख्या इतकी आहे कि मुठभर राज्यकर्ते किंवा प्रशासन काहि सगळ्या गोष्टिंच ,समस्यांच निराकरण करू शकत नाही आजची परिस्थिती पाहता हे तुम्हाला पटेल ही. आधिच लाँकडाऊन बरया पैकी सर्वांनी पाळल पण नंतर करोनाची खिल्ली उडवली.न मास्क लावले ना सोशल डिस्टंसिंग पाळल ,हात धुतले की नाही कुणास ठाऊक. आपण भारतिय लोक बरयाच बाबतित ग्रेट असलो तरी नियम पाळण तेहि काटेकोर आपल्याला फारस जमल नाहिच. ज्या गावांत लोकप्रतिनिधि व गावकरयांनी मिळून स्व:ता सगळे नियम पाळलेत ,योग्य नियोजन केल ति गाव करोना मुक्त राहिलीत . आपली लग्नं ,मरणं ,सोहळे आपणच साजरे करून एका घरात बरयाच लोकांना करोनाची लागण करून घेतली. जस कुंभमेळा थांबला पण लाॅकडाऊन मधे दिलेल्या सुटिच्या वेळात अजुनही गर्दी करण थांबल नाहीय. दुकानं ,भाजी बा...