मी जबाबदार
सुंदर ,योग्य शिर्षक आणि मजकुरही . आपण नागरिक म्हणून शिस्त पाळली तर अनेक समस्या कमी होतिल किंवा समस्या निर्माणच होणार नाही.तुम्ही म्हणाल हे कस ? आपली लोक संख्या इतकी आहे कि मुठभर राज्यकर्ते किंवा प्रशासन काहि सगळ्या गोष्टिंच ,समस्यांच निराकरण करू शकत नाही आजची परिस्थिती पाहता हे तुम्हाला पटेल ही.
आधिच लाँकडाऊन बरया पैकी सर्वांनी पाळल पण नंतर करोनाची खिल्ली उडवली.न मास्क लावले ना सोशल डिस्टंसिंग पाळल ,हात धुतले की नाही कुणास ठाऊक.
आपण भारतिय लोक बरयाच बाबतित ग्रेट असलो तरी नियम पाळण तेहि काटेकोर आपल्याला फारस जमल नाहिच.
ज्या गावांत लोकप्रतिनिधि व गावकरयांनी मिळून स्व:ता सगळे नियम पाळलेत ,योग्य नियोजन केल ति गाव करोना मुक्त राहिलीत .
आपली लग्नं ,मरणं ,सोहळे आपणच साजरे करून एका घरात बरयाच लोकांना करोनाची लागण करून घेतली.
जस कुंभमेळा थांबला पण लाॅकडाऊन मधे दिलेल्या सुटिच्या वेळात अजुनही गर्दी करण थांबल नाहीय.
दुकानं ,भाजी बाजार ,बँकां,वाईन शाॅप्स सगळी कडे मरणाची गर्दि असते मरणाच् मुद्दामच म्हटल कारण या ठिकाणि बरिच मंडळी मास्क शिवाय ही असतेच ,काहींचे मास्क गळ्यात लटकवलेले तर काहींचे नाकाच्या खाली ,परत ढकला ढकली करत आम्हि मरणा साठीच रांगेत आपला नंबर आधि येण्या साठी भांडतोय अस वाटत.
हे संकट आत्ताच आहे पण अनेक संकट नागरिक आपल्या वाईट सवई व' चलता है 'वृत्ति मुळे ओढवून घेतात.
आज सरकार ,प्रशासन आणि काळा बाजार करणारयांना आपण शिव्या घालतोय पण -----
पण हे जे काय सरकार आलय ते आपणच निवडून दिलय.प्रशासन म्हणाल तर त्यांच्या पापात आपण ही भागिदार आहोतच कि ,तातपुरता स्वार्थ ,वाम मार्गाने काम करवूण घेणे हि आपल्यला लागलेली सवय.
बरयाच दा आपल्याला दिसत असत कि समोरची व्यक्ति चुकतेय पण आपण त्याला विरोध करत नाही व कुणि त्या विरोधात उभा रहिलाच तर लांबूनच तमाशा बघण्यात धन्यता मानतो.
आपली बांधीलकि आपल्या कुटुंबा पुरतिच राहिली तर समाज ,सरकार वा व्यस्थेला नाव ठेवण्याचा वा त्यांच्या कडे बोट दाखवण्याचा आपल्याला काहिच अधिकार नाही.
आपण निसर्ग वा कुठल्याहि आपत्तिला गृहित धरण आतातरी थांबवाव लागेल .
दूसर कुणि तरी काहीतरी करेलच याची वाट न बघता प्रत्येकानेच जबाबदार व्हाव लागेल.घरात एखादि गोष्ट कमी पडेल म्हणून जपून वापरणारी गृहिणि किंवा अडिअडचणि साठी बचत केलेला पैसा , सात च्या आत घरि यायला सांगतांना मुलांच्या सुरक्षीततेचा विचार करणारे आपण देशाच्या ,जगाच्या लेवलला हा विचार नाहि का करू शकत ?
या तुन नैसर्गिक ,खनिज संपदा वा लोकांसाठीच्या व्यवस्थां कमि वारपल्या जातिल किंवा त्यांची बचत करता येईल .गरज नसलेल्या लोकांनी सरकारि सवलति वा योजनांचा लाभ न घेता त्या गरजूनांच मिळतिल अशी व्यवस्था केली तर अनेक आघाड्या जिंकता येतिल.
कुटुंब मग ते संयुक्त , एकत्र ,देशाच किंवा जगाच असल आणि जबाबदारी सगळ्यांनि घेतली तर ते प्रगतिही करत आणि सुखि ही राहत .
बघा जमतय का? नाहितर पुढचे हाॅस्पिटलच्या लाईनितले आपण असू किंवा हार चढवलेल्या फोटोतले तरी.
Comments
Post a Comment