ज्योतिबांचा शोध जारी
आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती .महात्मा हि पद्वि मिळण्या मागे त्यांच महान काम आहे यात कुणालाच शंका नसावी.
मागच्याच महिन्यात सावित्रीबाईंची 10 मार्चला पुण्यतिथी झाली.त्या आधि 8 मार्चला जागतिक महिलादिन साजरा केला गेला, हो ! तो बरयाच प्रमाणात फक्त साजरा केला जातो बैलपोळ्या सारखा .म्हणजे सगळ जग साजरा करत म्हणून बायको,आई ,मैत्रिण यांना शुभेच्छा देऊन ,एखाद गिफ्ट ,बाहेर जेवायला नेण अस सगळ करून तिला एक दिवस पलको पे बिठाने जैसा फिल करवल जात.
आपण हि भाळतो ,काहिनां कळत पण काय हरकत आहे एक दिवस स्पेशल फिल करायला. एक दिवस तर एक दिवस.
पण त्याच दरम्यान जगभरातल्या महिलांच्या कौटुंबीक,आर्थीक,सामाजीक व आरोग्यविषयक स्थितीची वास्तव माहीती समोर आलि.अनेक वर्ष दहावि /बाराविच्या परिक्षां मधे बोर्डात जास्त संख्येने, चांगल्या गुणांनी पास होणारया मुलि कुठे जातात हा प्रश्न विश्वास नांगरे पाटील त्यांच्या कवितेत विचारतात.
मग हा प्रश्न त्या मुलिंना विचारण्यात येतो त्या पेक्षा तो त्यांच्या आयुष्यात येणारया पुरूषाला विचारला जावा अस वाटत नाही का?
मग ज्योतिबांचा शोध सुरू व्हावा असही वाटून जात ,त्या संदर्भात समाजमाध्यम आणि वर्तमान पत्रात बरेच लेख प्रसिध्द झाले.
त्यातच लोकसत्ताची पुरवणी "चतुरंग" यात जोतिबांचे लेक या सदरात हरिश सदानी अश्या वेगळ्या वाटेवर चालणारया जोतिबांच्या लेकां बद्दल लिहितात.
मग कधि एखादयाला आया -बहिणीं वरून दिल्या जाणारया शिव्या ऐकून वाईट वाटत तो संवेदनशिल मनाचा जोतिबाचा लेक पुढच्या पिढीला " गाली बंद" अशी हाक देतो.लहानपणा पासून घरात आणि घराबाहेर या Uncencerd असणारया शिव्या मुल ऐकत असतात आणि त्यांचा अर्थ ही कळू नये त्या वया पासून तेही त्या वापरायला लागतात. मग मोठ होत होत कधि बाहेर भांडन झाल की त्या अतिशय तोशानि वापरल्या जातात ,घरातही बायको ,मुलांना त्या सहजच दिल्या जातात.
हे सगळ थांबाव म्हणून हा मुलांना ते कस चुकिच आहे हे सांगून, शाळां मधूनही त्या बद्दल जागृती करतोय .
तर पँडमँन सारखच काम करणारा हा इशान्येतिल पँडमँन. तो फक्त स्वस्त पँडची निर्मिती करून थांबला नाहीतर मुलांमुलीं मधे पाळी संबधीचे गैर समज दुर व्हावेत ,तिच्या त्या काळातिल वेदनांची जाणिव त्याच्यां तही यावी या साठी प्रयत्न करतोय.
अशे अनेक ज्योतिबांचे लेक या सदरातून हरिश सदानी आपल्या पर्यंत पोहचवतिल.पण---------
तरीही हा पण का ? हा प्रश्न आहेच कारण मुलीं शिकून सावित्री झाल्या(फक्त एक शिक्षण घेतल ते च काय ते साम्य ,कारण सावित्रीची कळकळ यायला हि काहि अपवाद आहेतच) पण ज्योतिबा नाही मिळाला म्हणून आज इतक्या वर्षां नंतरही शिक्षण अन्याय ,अत्याचाराल वाचा फोडत ,त्याची जाणिव करवत हे स्त्रियांच्या बाबतित खोटच ठराव अस वाटत.
ति शिकते ,स्वत:ला सिध्द करते , पण तिच्या वाटेत एकतर काँटेच जास्तच पेरले जातात (काल परवाच आपण दिपाली चव्हाण या रणरागिनी ला गमावल) नाही तर घर ,मुलं, जबाबदारया ,बाहेरची वाईट परिस्थीती अश्या अनेक बेड्या घातल्या जातात.
स्वात्तंत्र्य हे ही तिच्या साठी अजून कोसो दूर आहे.
अश्यातच लोकसत्ताचेच संपादक गिरीश कुबेर गांधारीची पट्टी-- अश्या काहीश्या मथळ्याखाली लेख लिहीतात तेव्हा वाटत हे प्रश्न ज्या पुरूषांना पडतात किंवा ज्यांना या जाणीवा होतात ते जग मर्यादित आहे ,ति पहाट अनेकींच्या आयुष्यात अजुन आलीच नाही .
काय होत अदन्यानात आनंद आहे अशा पण बरयाच बायका आहेत ज्यांना आपल्या वर काही अन्याय होतोय अस वाटतच नाही म्हणून त्या आपल्या सोन्याच्या पिंजरयालाच जग समजणारया आनंदात आहेत .
त्यात ज्यांना हे कळायला लागत की आपल्या वर अन्याय होतोय ,साध्या साध्या गोष्टींच स्वातंत्र्य मला मिळत नाही.माझ्या आयुष्याचे निर्णय दुसरच कुणी घेतय त्या स्रियांची घुसमट होतेय मग काय भांडतच रहायच ? परत तिच्यावर कुटुंब संस्था विस्कळीत करण्याचे बोल लावले जातात.मुलांच भविष्य हि तिची जबाबदारी (पण स्वत: साठीची तिची जबाबदारी ति नेहमीच दुय्यम मानून बाजूला ठेवते.)
अशात अनेक राखीव जागा असोत,30% आरक्षण असो,तिचा संपत्तितला वाटा असो ,तिच्या घरकामाच मुल्य असो हे सगळ नावाला , नाटक .
यात बदलाचे वारे किती वेगाने धावतात कि एखाद वादळच परिवर्तन करत हे आज अनेक ज्योतिबा घडवले तर आणि तरच शक्य होईल.
Comments
Post a Comment