Posts

Showing posts from June, 2019

तीची प्रश्नार्थक नजर

             स्कुबी   स्कुबी काही दिवसां साठी आलेल  कुत्र्याच 3/4 दिवसाच पिल्लु. या अनाहुत  पण गोंडस पाहुन्याच  घरातील  सगळ्यानीच  स्वागत केल.बाळच ते मग माणसाच  असो की कुत्र्याच गोजीर  adorable,cute . सगळे अगदी तिची काळजी घेत होते  .तीच खाणंपिण ,आघोळ ,तीला फिरायला नेणं सगळच. कधी कधी तिच्या साठी खास अस  बोबिंल घरात  यायला  लागल.दिवसागनिक स्कुबडु मोठी व्हायला लागलि. अन  वयात आलेल्या  मुलिनां  जस  मुल  त्रास द्यायला लागतात तसच काहिस स्कुबीच्या बाबतीत व्हायला लागल. आजुबाची कुत्री फाटक उघड असल की आत यायला लागली,कधी कंम्पाउड ओलांडुन त्याचं तीला  त्रास देण  सुरु झाल. या सगळ्यात  ती  आई झाली .तिच वय लहान अन अश्यात  हे सगळ .तीनच तीची दोन पिल्ल खाल्ली हे न बघावस वाटनारी मी एका अर्धवट वाढलेल्या पील्लाला बाहेर टाकुन आले.या सगळ्या वेदनादाइ कार्यक्रमात  पार्कींग मधे रक्तच रक्त ,तिच्या अस्वस्थतेत झाडांची माती उकर लेली. अस सगळ बघुन यांनी त...

क्रिकेट फिवर

Image
गल्ली ते दिल्ली👉 आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत.अगदी लहान,मोठे पुरुषच काय स्रीया ही सामने अगदी डोळ्यात तेल घालुन बघतात.हो पण स्रीया फक्त भारत खेळत असेल तर जास्तच--- आज सहजच पावसाची मजा घेत होते बाहेर बसुन तर आऊट आऊट म्हनुन गलका चालु होता. बँटिग करणारा विरुध्द इतर.मग अनेक नियम सांगुन,ठरलेल्या ठिकाणी गेला की आऊट,इकडे,चौकार आणि इकडे छ्क्काअस करत करत शेवटी त्या बीच्चारयाला बँट सोडावि लागली.  पावसाच्या बरसनारया धारां सोबत या धावाही चालु होत्या. आता कुनाचि तरी आई हाका मारायला लागली,पावसाचा जोर जरासा वाढलाच होता त्यात अंधार पडायला लागला. परत एकदा आई ओरडते पण  तिच्या हाकेला ओ -- ही न आल्यामुळे ती माऊलि प्रत्यक्ष हजर. आता मात्र सामना थांबवावाच लागला. असा गल्लीतला सामना पावसा मुळे नाही तर आई मुळे थांबला अन कुणी विराट ,कुणी धोनि,कुणी धवन तर कुणी बूमरा उद्या च्या प्राँमिस सोबत पँवेलीयन 😄म्हणजे घरी गेले.

ओंजळ

                        ओंजळ आज अखेर तो बरसला,अन तनाला,मनाला,धरनीला गारवादेवून जरा शांत झाला. खरतर गेले 3/4 महीने आपण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आला,अन त्यान जिंकुन घेतल,असा पाऊस😌 खर तर तो येतोच थोडा लवकर,कधि थोडा उशीरा,कधि जास्त,कधी थोडा. हा निसर्ग मोठा दाता आहे  तो सकाळच्या प्रकाशा पासुन, रात्रीच्या सुखद विश्रांती देणारया अंधारा पर्यंत, जीवन देणारया पाण्या पासुन हवा देणारया वारया पर्यंत, चिवचिवनारया चिमणी पासुन गरजनारया सिंहा पर्यंत, जन्मा  पासुन पोषन करत अखेरिस तिरडी वरच्या लाकडा पर्यंत तो सावली  सारखा      ----- नाही पण तीही कधीतरी आपली साथ सोडतेच पण तो असतोच आपला सखा, मायबाप . आज जगभर दुष्काळ,प्रदुषण,वातावरणाचा असमतोल यावर ओरड होतेय,अनेक उपाय सुचवले जाताहेत पण याला कारण आपणच, भरभरुन देणारया या निसर्गाला चहुबाजुने ओरबाडले आहे. आत्ता   त्याच्या कडुन दात्रुत्व शिकणारया आपली त्याला  देन्याची वेळ आलीय. खर आपली लायकीच नाहीय त्याला काही देण्याची पण आपल्या साठीच आपण हे...