तीची प्रश्नार्थक नजर

             स्कुबी 

स्कुबी काही दिवसां साठी आलेल  कुत्र्याच 3/4 दिवसाच पिल्लु. या अनाहुत  पण गोंडस पाहुन्याच  घरातील  सगळ्यानीच  स्वागत केल.बाळच ते मग माणसाच  असो की कुत्र्याच गोजीर  adorable,cute .
सगळे अगदी तिची काळजी घेत होते  .तीच खाणंपिण ,आघोळ ,तीला फिरायला नेणं सगळच.
कधी कधी तिच्या साठी खास अस  बोबिंल घरात  यायला  लागल.दिवसागनिक स्कुबडु मोठी व्हायला लागलि.
अन  वयात आलेल्या  मुलिनां  जस  मुल  त्रास द्यायला लागतात तसच काहिस स्कुबीच्या बाबतीत व्हायला लागल.
आजुबाची कुत्री फाटक उघड असल की आत यायला लागली,कधी कंम्पाउड ओलांडुन त्याचं तीला  त्रास देण  सुरु झाल.
या सगळ्यात  ती  आई झाली .तिच वय लहान अन अश्यात  हे सगळ .तीनच तीची दोन पिल्ल खाल्ली हे न बघावस वाटनारी मी एका अर्धवट वाढलेल्या पील्लाला बाहेर टाकुन आले.या सगळ्या वेदनादाइ कार्यक्रमात  पार्कींग मधे रक्तच रक्त ,तिच्या अस्वस्थतेत झाडांची माती उकर लेली.
अस सगळ बघुन यांनी तीला दूर सोडुन यायला सांगीतल.
आणि सकाळीच तीची रवानगी झाली.
अशे चार  दिवस गेले ,तीची काळजी वाटच होती.
कुणी तिला खायला दिल असेल का ?कुणी मारल असेल का? कुत्र्यांनी त्रास तर दिला नसेल ना.
आज सकाळी ऊठुन बाहेर आले तर तिचा भुंकायचा आवाज आला फाटकाच्या बाहेर खरच ती परत आलि होती.
अन तीच्या नजरेत प्रश्न होता का सोडलस मला? काय चुक होती माझी?
याप्रश्नांच उत्तर होत का माझ्या कडे?
तर कदाचीत ती  ही स्री होति एवढच असेल का?


Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल