क्रिकेट फिवर
गल्ली ते दिल्ली👉
आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत.अगदी लहान,मोठे पुरुषच काय स्रीया ही सामने अगदी डोळ्यात तेल घालुन बघतात.हो पण स्रीया फक्त भारत खेळत असेल तर जास्तच---
आज सहजच पावसाची मजा घेत होते बाहेर बसुन तर आऊट आऊट म्हनुन गलका चालु होता.
बँटिग करणारा विरुध्द इतर.मग अनेक नियम सांगुन,ठरलेल्या ठिकाणी गेला की आऊट,इकडे,चौकार आणि इकडे छ्क्काअस करत करत शेवटी त्या बीच्चारयाला बँट सोडावि लागली. पावसाच्या बरसनारया धारां सोबत या धावाही चालु होत्या.आता कुनाचि तरी आई हाका मारायला लागली,पावसाचा जोर जरासा वाढलाच होता त्यात अंधार पडायला लागला.
परत एकदा आई ओरडते पण तिच्या हाकेला ओ -- ही न आल्यामुळे ती माऊलि प्रत्यक्ष हजर.
आता मात्र सामना थांबवावाच लागला.
असा गल्लीतला सामना पावसा मुळे नाही तर
आई मुळे थांबला अन कुणी विराट ,कुणी धोनि,कुणी धवन तर कुणी बूमरा उद्या च्या प्राँमिस सोबत पँवेलीयन 😄म्हणजे घरी गेले.
Comments
Post a Comment