ओंजळ

                       ओंजळ

आज अखेर तो बरसला,अन तनाला,मनाला,धरनीला गारवादेवून जरा शांत झाला.
खरतर गेले 3/4 महीने आपण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो.
आला,अन त्यान जिंकुन घेतल,असा पाऊस😌 खर तर तो येतोच थोडा लवकर,कधि थोडा उशीरा,कधि जास्त,कधी थोडा.
हा निसर्ग मोठा दाता आहे  तो सकाळच्या प्रकाशा पासुन, रात्रीच्या सुखद विश्रांती देणारया अंधारा पर्यंत,
जीवन देणारया पाण्या पासुन हवा देणारया वारया पर्यंत,
चिवचिवनारया चिमणी पासुन गरजनारया सिंहा पर्यंत,
जन्मा  पासुन पोषन करत अखेरिस तिरडी वरच्या लाकडा पर्यंत तो सावली  सारखा      ----- नाही पण तीही कधीतरी आपली साथ सोडतेच पण तो असतोच आपला सखा, मायबाप .
आज जगभर दुष्काळ,प्रदुषण,वातावरणाचा असमतोल यावर
ओरड होतेय,अनेक उपाय सुचवले जाताहेत पण याला कारण आपणच, भरभरुन देणारया या निसर्गाला चहुबाजुने ओरबाडले आहे.
आत्ता   त्याच्या कडुन दात्रुत्व शिकणारया आपली त्याला  देन्याची वेळ आलीय.
खर आपली लायकीच नाहीय त्याला काही देण्याची पण आपल्या साठीच आपण हे करायला हव नाहीतर त्याचा कडुन भरनारि आपली ओंजळ रीतीच राहील.
तर ही ओंजळ भरण्यासाठी आपल्याला, ती मोठिठ करावी लागेल.
ही ओंजळ मोठी करण्याच काम आज जलमित्र बनलेले आपले अनेक मावळे कधि एकट्याने,कधि समुहाने खिंडलढवत आहेत .
सलाम पाणी फाऊडेंशन च्या सगळ्या जागत्याना.
चला तर मित्रानों आपली ओजंळ मोठ्ठी मोठ्ठी करुया,🌴🌴🌴 खुप खुप झाड लावुन त्याच ऋण फेडुया.
🌴🌏🌴.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल