Posts

Showing posts from August, 2019

मुखवटे

      मुखवटे या शब्बदात बरच काही दडलय.जे आपल्या सर्वंनच्याच आयुष्यात ंवेगवेगळया वळणावर वेगळीच वळन घेऊन येत वा एखाद्या मुखवट्या खालच खर रूप न समजल्याने आपणच आपल आयुष्य त्यात विस्कळीत करून टाकतो.       दुसरेच नाही तर आपणही लहाण पणा पासून वेगवेगळ्या प्रसंगी ,वेवेगळ्या लोकां समोर अनेक मुखवटे लावून वावरत असतो.        आईच लक्ष आपल्या कडे वळवण्या साठी कधी रडक तोंड तर कधी एकदम गोजीर निरागस रूप म्हणजे तीला आपल्याला जवळ घेतल्या शीवाय राहवणारच नाही. न आवडणारया एखाद्या व्यक्ती पासुन तीच्या कडे जायच असल्यास जोरात भोकाड पसरतो.     अश्या अनेक क्लुपत्या आपल्या लहाणपणीच आपण वेगवेगळे मुखवटे लेऊन आईला आपल्या तालावर नाचवत असतो.       पुढे पुढे हे मुखवटे जास्तच बदलत जातात अन आपण खरे कोण हेही कदाचीत विसरायला होत.       वाचनाने समृध्द,प्रगल्भ झालेली मी काही गोष्टी पटत नसल्या तरी तेव्हा समोर आलेल्या व्यक्तीं नुसार माझा मुखवटा बदलते.      मग त्या नुसार कधी उपवास करते,कधी साग्रसंगीत पुजा करते. श्र...

आजीम्या देव पाहीला

Image
     हे व असे अनेक फोटो ,विडीओज पुराच्या दरम्यान समाज माध्यंमावर शेअर केले जात होते.      हा फोटो बरतच काही सांगून जातो .मग ती मंदीर-मस्जीत या दोंघा मधल्या असलेल्या नसलेल्या देव वा अल्लाची सारखी अवस्था व  त्यांना माननारयांची अवस्था,      अन कुठलाही भेदभाव न ठेवता केलेले सैनिकांचे काम.  खरच सँलुट त्या सर्व वर्दीतल्या व सामान्य पण विशेष काम करणारया प्रत्येक माणसाला ज्याने जीवाची पर्वा न करता झोकुन दिले स्वताला या लढाईत लोकांना वाचवण्या साठी.      मिळेल त्या साधना सोबत वा शिवाय अनेक जीव वाचवले. त्यांच्या पर्यंत मदत पोहचवली.   दिवस -रात्र उभ राहुन सावरल अनेकांना .प्रत्यक्ष त्या ठीकाणी काम केल उंटावरून शेळ्या हाकनारया अनेकांनी व्यवस्था,सरकारच्या नावान बोट मोडली पण ज्यांना करायच होत ते आले ,केल सार कुठलाही टेंभा न मिरवता.     आहे च चुक शासनाची पण दोस्त हो  कुणी बुडतय तर वाचवायला उडी घ्यायची सोडुन काठावर बोंबामारत बसायच का?    असो ते त्यांच्या कुवती प्रमाणे वागतात पण या सगळ्या मानवाच्य...

जागते रहो

          गेले पंधरा दिवस आपण सगळे वेगळ्याच भयाने ग्रासले आहोत. पावसाची आतुर तेने वाटपाहणारे व मग त्याच्या येण्याने सुखावलोही.तो कुठे जास्त ,कुठे कमी तर कुठे अजीबातच नव्हता.        पण हळुहळु त्याने रौद्ररूप धारण केले अन गालावर हसू आणनारा तो डोळ्यात ले अश्रू बनून बरसू लागला.       अनेक ठिकानी थोडा अंदाज असल्याने (कधी कधी हवामान खात्याचे अंदाज असतात बरोबर) हवे ते नीयोजन केले गेले,लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवने,त्यांच्या खाण्यापिण्याचा व्यवस्था , तात्काळ सेवांची उपलब्धता अस सगळ.         पण--------  काही ठिकाणी अंदाजच न आल्याने रांत्रीतन त्याने सगळा गाव कवेत घेतला ,जिथे लोक तर झोपले होतेच पण शासन ही निंद्रेत असल्याने सगळच त्याच्यात सामाउन गेल.       रस्तोरस्ती पाणीच पाणी        घरात दारात      शेतशिवारात     सगळी कडे पाणीच पाणी    काही माणस गेली उंच जागेवर पण जनावरांच काय ? त्यातली काही वातवली ,तीही घराच्या गच्ची वर नेउन. ...