आजीम्या देव पाहीला

     हे व असे अनेक फोटो ,विडीओज पुराच्या दरम्यान समाज माध्यंमावर शेअर केले जात होते.
     हा फोटो बरतच काही सांगून जातो .मग ती मंदीर-मस्जीत या दोंघा मधल्या असलेल्या नसलेल्या देव वा अल्लाची सारखी अवस्था व  त्यांना माननारयांची अवस्था,
     अन कुठलाही भेदभाव न ठेवता केलेले सैनिकांचे काम.
 खरच सँलुट त्या सर्व वर्दीतल्या व सामान्य पण विशेष काम करणारया प्रत्येक माणसाला ज्याने जीवाची पर्वा न करता झोकुन दिले स्वताला या लढाईत लोकांना वाचवण्या साठी.
     मिळेल त्या साधना सोबत वा शिवाय अनेक जीव वाचवले. त्यांच्या पर्यंत मदत पोहचवली.
  दिवस -रात्र उभ राहुन सावरल अनेकांना .प्रत्यक्ष त्या ठीकाणी काम केल उंटावरून शेळ्या हाकनारया अनेकांनी व्यवस्था,सरकारच्या नावान बोट मोडली पण ज्यांना करायच होत ते आले ,केल सार कुठलाही टेंभा न मिरवता.
    आहे च चुक शासनाची पण दोस्त हो  कुणी बुडतय तर वाचवायला उडी घ्यायची सोडुन काठावर बोंबामारत बसायच का?
   असो ते त्यांच्या कुवती प्रमाणे वागतात पण या सगळ्या मानवाच्या देवत्वाची प्रचीती येते कुठे आज माणसातल्या माणुसकीला शोधनारे आपण त्याच्या रूपाने साक्षात तारणहाराचे दर्शन घेतो.
      मग एखादा वासुदेव खवळलेल्या प्रवाहातुन आपल्या चीमुकल्याला डोक्यावर घेत सुरक्षीत स्थळी नेतो .
 कुठे गोवर्धना सारख अनेकांच रक्षण करतो.
      तर कुठे श्रावण बाळा सारख म्हातारया जीवांना खांद्यावर  घेऊन त्यांचे जीव वाचवतो .
    कुणी अवघड लेल्या गरोदर बहीणीची कृष्ण रूपात येवून सुटका करतो.
     काही अल्लाचे बंदे आपल्या द्रोपदीच्या थाळीतुन अनेकांची भुक भागवत ईद साजरी करतात.
       काही स्वत: च दु:ख विसरून इतरांना साठी उभे राहतात.
      या देवदुतांना बघुन आज अल्ला ,भगवान पण खुष झाला असणार कारण त्याने आपल्याला  दिलेली प्रेमाची शिकवण हे अजुन विसरले नाहीत .त्यांच्यात करूणा ,दया अजुन वास करतेय.
   यांच्यातल्या देवत्वाला काही माया बहीणी नतमस्तक  होतात.
    हाच तर असतो कुठलाही भेदभाव न करणारा ,सगळ्यांवर सारखच प्रेम करणारा , एक देव ,मालीक,अल्ला, भगवान,गाँड.
    तसेच हे वर्दीतले भगवान  ज्यांच्या साठी सगळेसमान असतात.हिंदू -मुस्लीम ,गरीब -श्रीमंत सगळे सारखे
     बस जीसे ,जहाँ, जैसी जरूरत हो हाजीर हैै.
 "आजीम्या देव पाहीला" वर्दीतला.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल