जागते रहो

          गेले पंधरा दिवस आपण सगळे वेगळ्याच भयाने ग्रासले आहोत. पावसाची आतुर तेने वाटपाहणारे व मग त्याच्या येण्याने सुखावलोही.तो कुठे जास्त ,कुठे कमी तर कुठे अजीबातच नव्हता.
       पण हळुहळु त्याने रौद्ररूप धारण केले अन गालावर हसू आणनारा तो डोळ्यात ले अश्रू बनून बरसू लागला. 
     अनेक ठिकानी थोडा अंदाज असल्याने (कधी कधी हवामान खात्याचे अंदाज असतात बरोबर) हवे ते नीयोजन केले गेले,लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवने,त्यांच्या खाण्यापिण्याचा व्यवस्था , तात्काळ सेवांची उपलब्धता अस सगळ.
        पण--------
 काही ठिकाणी अंदाजच न आल्याने रांत्रीतन त्याने सगळा गाव कवेत घेतला ,जिथे लोक तर झोपले होतेच पण शासन ही निंद्रेत असल्याने सगळच त्याच्यात सामाउन गेल.
      रस्तोरस्ती पाणीच पाणी
       घरात दारात
     शेतशिवारात
    सगळी कडे पाणीच पाणी
   काही माणस गेली उंच जागेवर पण जनावरांच काय ?
त्यातली काही वातवली ,तीही घराच्या गच्ची वर नेउन.
    यंत्रणा ,समाजसेवी संस्था,काही जागृत युवक ,नागरीक
सगळेच सारया शक्ती निशी कामाला लागले.
    ज्याला जे जमेल ते ,जे सुचेल ते  कुठलाही भेदभाव न करता करत होते.
   आता पुर ओसरल्यावर बरच चित्र स्पष्ट होईल.
 उजाडलेले संसार,असताव्यस्त झालेली घर,शाळा,गोठे अन भुईसपाट झालेली पिक.सगळ्या स्थरा वर मदतीच्या हातांची गरज पडेल ती तन,मन अन धनाने.
     हो पण शिर्षक,"जागते रहो" च काय ?
 दोस्त हो हा निसर्गाने दिलेला इशारा होता .तो त्याच्या परीने वेळो वेळी अशे इशारे देत असतो ,मानवाला त्याच्या विकासरूपी कुभंकरणाच्या निद्रेतुन जागकरण्या साठी.
    आपल सगळच  त्या विध्वंसात भस्मसात होउन जात.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल