Posts

Showing posts from November, 2019

झपाटलेले वेडे

        सकाळी पेपर वाचायला घेतला तर आज" no negative news,positive Monday " या शिर्षका खाली ऐका पानावर जवळ  जवळ सगळ्याच बातम्या म्हणजे माहीती होती , ती आपल्या आजूबाजूला ूचालू असलेल्या निस्वार्थ सेवा करणारया अवलीयांची.              कुणी कचरा वेचणारया मुलानां शिकवून त्यांची शाळेची तयारी करून घेऊन त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देतात.     काही रस्त्याच्या बाजूला   फूटपाथवर राहणारया  मुलानां शिकवतात.     ऐक वेडी मुलानां वाचायला मिळाव म्हणून अफगाणिस्थानात फिरती लायब्ररी चालवते.       काही रस्त्यावरच्या मतीमंद (दिव्यागं) भिकारयानां आंघोळ घालून त्यांच्यावर औषधोपचार करतात.    या पुढे जाऊन काही त्याचा साभांळ करतात. त्याना ऐक सुरक्षीत ,आनंददाई आयुष्य देतात.      काही अवलीया निर्वासीतांच्या वस्तीत त्यांच्या शारीरीक व मानसीक जख्मांवर मलम लावतात.      खेळ व मनोरंजनाद्वारे त्याच्यां जीवनात आनंद आणतात.    इराक,सिरीया ,इस्रायल, अफगाणिस...

Still !अच्छाई जिंदा हैै--

         बरयाच वर्षा पासून दोन धर्मांच्या अस्मीतेचा प्रश्न ठरलेल अयोध्येच" राम मंदीर -बाबरी मस्जीत" प्रकरण एकदाच कोर्टाच्या अंतीम निर्णयाने व आपण सर्व भारतीयांच्या परस्पर सामंजस्याने तसेच सतर्क यंत्रणे मुळे शांततेत स्वीकारल गेल व एकदाच पार पडल अस म्हणायला हरकत नाही.      आज आपल्या सारयां समोर इतर अनेक मुलभूत प्रश्न आहेत त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या मंदीर -मस्जीत प्रश्नावर भांडून आहेत्यात आणखी भर घालून सामान्य माणसाचे प्रश्न ,समस्स्या वाढवायच्या,त्याच्या रोजीरोटीवर गंडातर आणायच कुणालाही नको आहे .नेहमीच असल्या संघर्षात लोकांना भडकवणारी डोकी सुरक्षीत राहतात पण सामान्य माणस भरडली जातात.   ज्या रामासाठी लोक रक्तपात करायला तयार असतात त्यान तर स्वात:च्या राजपाठावर पाणी सोडल होत ,तो असता तर खरच भांडला असता का?   ज्या मंस्जीदी साठी मुसलमानानां भडकवल जातय तो अल्ला तर माफ करणारा ,दया करणारा ,हिंसा ,खोट, मोह यां गोष्टी निशिध्द माननारा.अस मानल जात या बेसीक गोष्टी सारया नां माहीत आहेत.   कारण अशे बरेच नियम रोज्यांच्या दरम्यान पाळले जातात. एक...

वाटाड्या,(The guide, light house)

            वाटाड्या,वाट दाखवणारा!बस हाच अर्थ आहे याचा. अर्थात आयुष्याच्या वाटेवर चालतानां याला एक वेगळाच ,गहन अर्थ प्राप्त होतो.      जसा अर्जुनाचा वाटाड्या भगवान कृष्ण, ज्याने अर्जुना बरोबर आपल्या सगळ्यानां  " गीते" द्वारे ग्यान देवून कर्माची योग्य वाट दाखवली.  आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक वळणावर एका योग्य वाटाड्याची गरज असते.मार्ग चुकला की सगळच चुकत जात.    आई प्रथम गुरू तशीच ती आपल्या आयुष्यातील पहिला वाटाड्या.रांगायला प्रोत्साहन देण्या पासून ते बोट धरून चालयला तीच तर असते सदा वाटाड्या बनून.पुढे या बालपणातून जरास पुढे याव तर बाबा वाटाड्या असतो, असली दुनियादारी तोच तर शिकवत असतो.      बरयाच लोकांच्या आयुष्यात या दोन वाटाड्यांनी दाखवलेली वाटच अंतिम ध्येया पर्यंत पोहचवते.  पुढे शाळेतले शिक्षक,मित्र वाटाड्याच काम करतात.त्यात कधी रस्तयावर भीकमागणारी मुल किंवा आपल्या उदरनिर्वाहा साठी काही तरी विकणारी ,बुट पाॅलिश करणारी ,कचरा वेचणारी अशे अनेक वाटाडे त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांनी निवडलेल्या स...