झपाटलेले वेडे

        सकाळी पेपर वाचायला घेतला तर आज" no negative news,positive Monday " या शिर्षका खाली ऐका पानावर जवळ  जवळ सगळ्याच बातम्या म्हणजे माहीती होती , ती आपल्या आजूबाजूला ूचालू असलेल्या निस्वार्थ सेवा करणारया अवलीयांची.
             कुणी कचरा वेचणारया मुलानां शिकवून त्यांची शाळेची तयारी करून घेऊन त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देतात.
    काही रस्त्याच्या बाजूला   फूटपाथवर राहणारया  मुलानां शिकवतात.
    ऐक वेडी मुलानां वाचायला मिळाव म्हणून अफगाणिस्थानात फिरती लायब्ररी चालवते.
      काही रस्त्यावरच्या मतीमंद (दिव्यागं) भिकारयानां आंघोळ घालून त्यांच्यावर औषधोपचार करतात.
   या पुढे जाऊन काही त्याचा साभांळ करतात. त्याना ऐक सुरक्षीत ,आनंददाई आयुष्य देतात.
     काही अवलीया निर्वासीतांच्या वस्तीत त्यांच्या शारीरीक व मानसीक जख्मांवर मलम लावतात.
     खेळ व मनोरंजनाद्वारे त्याच्यां जीवनात आनंद आणतात.
   इराक,सिरीया ,इस्रायल, अफगाणिस्तान , अफ्रिकेतील  काही देश सततच्या युध्दजन्य परिस्तीथी मुळे होरपळलेत.
          स्त्रीया,लहान मुल यांच जीवन विस्कळीत झालय.हिंसाचार,बलात्कार या सारख्या गोष्टी तिथे नेहमीच चालू असतात. तिथली जनता नरकयातना भोगतेय.
   अश्या सगळ्या परिस्तीथीत केव्हाही आपण ऐखाद्या गोळीचा निशाना होऊ शकतो किंवा ऐखाद्या बाँम हल्ल्यात आपल्या शरिराची लक्तर होऊ शकता अस  सगळ माहीत असून तिथे ही निस्वार्थ सेवा करणारे ,दुसरयाचा दु:खावर फुंकर घालण्याच्या भावने ने  आपल्या जीवाची पर्वा न करता हे सगळ करत असतात.
      हे झाल मानवा साठी कांहीच प्राणी आणि निसर्गा साठी ही तेवढ्याच समर्पण भावनेने काम चालू असत . रस्त्यावरच्या जखमी प्राण्यांची देखरेख करणारे काही तर काही भटकी कुत्री,कावळे ,माकडं यांना खाऊ घालणारे.
     यात प्रकाश आमटेंच नाव सर्व परिचीत आहे.
आत्ताच आपण एका वृक्षसंवर्धन करणारया अम्माचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार केला.
     ही लिस्ट बरीच मोठी आहे व ती अशीच वाढत राहील
कारण अशी झपाटलेली वेडी माणस हा प्रेमाचा ,मानवतेचा झरा सतत वाहवत ठेवतील.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल