वाटाड्या,(The guide, light house)

            वाटाड्या,वाट दाखवणारा!बस हाच अर्थ आहे याचा.
अर्थात आयुष्याच्या वाटेवर चालतानां याला एक वेगळाच ,गहन अर्थ प्राप्त होतो.
     जसा अर्जुनाचा वाटाड्या भगवान कृष्ण, ज्याने अर्जुना बरोबर आपल्या सगळ्यानां  " गीते" द्वारे ग्यान देवून कर्माची योग्य वाट दाखवली.
 आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक वळणावर एका योग्य वाटाड्याची गरज असते.मार्ग चुकला की सगळच चुकत
जात.
   आई प्रथम गुरू तशीच ती आपल्या आयुष्यातील पहिला वाटाड्या.रांगायला प्रोत्साहन देण्या पासून ते बोट धरून चालयला तीच तर असते सदा वाटाड्या बनून.पुढे या बालपणातून जरास पुढे याव तर बाबा वाटाड्या असतो, असली दुनियादारी तोच तर शिकवत असतो.
     बरयाच लोकांच्या आयुष्यात या दोन वाटाड्यांनी दाखवलेली वाटच अंतिम ध्येया पर्यंत पोहचवते.
 पुढे शाळेतले शिक्षक,मित्र वाटाड्याच काम करतात.त्यात कधी रस्तयावर भीकमागणारी मुल किंवा आपल्या उदरनिर्वाहा साठी काही तरी विकणारी ,बुट पाॅलिश करणारी ,कचरा वेचणारी अशे अनेक वाटाडे त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांनी निवडलेल्या संघर्श व आशावादातून आपल्याला मार्ग दाखवत असतात.
  निसर्गातले अनेक घटक जस पक्षी,वृक्ष,झरे ,नद्या
,प्राणी,सुर्य,चंद्र ही सगळीच सृष्टी चक्रातली पात्र ,आपआपल्या वाटेवर चालत इतरांना वाट दाखवत असतात.
  अगदी सहजच पायवाटे वरून चालणाराही आपल्या ठिकाणा पर्यंत आपसुकच पोहचतो.
    एखाद प्रेरणादाइ पुस्तक गोधंळ लेल्या मनाला वाट दाखवत ,आहे त्या परीस्थीतीशी दोन हात करून आशेच्या प्रकाशा सोबत चालण्याची तर कधी भरकटलेल्या तरूणानां एखादा उत्तम वक्ता त्याच्या व्याख्यानातन नव्या वाटा दाखवतो.
   बस आँखे खुलीरख,सही राह के सही दिशा को चुनना हैै!
मज्जील दूर सही ,रास्ता कठीन सही लेकीन राह दिखाने वाला मिलगया तो -------

  

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल