Still !अच्छाई जिंदा हैै--

         बरयाच वर्षा पासून दोन धर्मांच्या अस्मीतेचा प्रश्न ठरलेल अयोध्येच" राम मंदीर -बाबरी मस्जीत" प्रकरण एकदाच कोर्टाच्या अंतीम निर्णयाने व आपण सर्व भारतीयांच्या परस्पर सामंजस्याने तसेच सतर्क यंत्रणे मुळे शांततेत स्वीकारल गेल व एकदाच पार पडल अस म्हणायला हरकत नाही.
     आज आपल्या सारयां समोर इतर अनेक मुलभूत प्रश्न आहेत त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या मंदीर -मस्जीत प्रश्नावर भांडून आहेत्यात आणखी भर घालून सामान्य माणसाचे प्रश्न ,समस्स्या वाढवायच्या,त्याच्या रोजीरोटीवर गंडातर आणायच कुणालाही नको आहे .नेहमीच असल्या संघर्षात लोकांना भडकवणारी डोकी सुरक्षीत राहतात पण सामान्य माणस भरडली जातात.
  ज्या रामासाठी लोक रक्तपात करायला तयार असतात त्यान तर स्वात:च्या राजपाठावर पाणी सोडल होत ,तो असता तर खरच भांडला असता का?
  ज्या मंस्जीदी साठी मुसलमानानां भडकवल जातय तो अल्ला तर माफ करणारा ,दया करणारा ,हिंसा ,खोट, मोह यां गोष्टी निशिध्द माननारा.अस मानल जात या बेसीक गोष्टी सारया नां माहीत आहेत.
  कारण अशे बरेच नियम रोज्यांच्या दरम्यान पाळले जातात.
एकंदीत राम काय अन अल्ला ,पैगंबर यानां माननारया लेकरानां त्यांच्या कडून दया ,प्रेम वारस्याने मिळालय ,सुख-शांती दे अशीच प्रार्थना करणारे आपन ती दुसरया कोणा कडून हिरावून कशी घेऊ शकतो?
   म्हणून तर चांगल अन वाईट दोन्हीच अस्तीत्व आहे आणि यात चांगल करणारे व चांगल बघणारे वाढले की सगळ छानच होणार नाही का?
    त्या चांगल्यात मी ही असाव अस वाटणारयांचा संख्या वाढतेय.
       दंगलीत होरपळलेली माणसे परत सावरतात ,दुसरयाला मदत करतात व ती होऊ नये या साठी प्रयत्नही करतात याच उत्तम उदाहरण आहे मालेगाव.
    पूरात उध्वस्त झालेले अनेक हात दूसरयानां सावरतात.इथे धर्म ,जातीच्या भिंती आडव्या येत नाहीत.
    लाखो कमवणारी तरूण मंडळी एैशो आराम सोडून वस्तीतल्या लेकरांच भविष्य घडवण्यात लागली आहेत .
  अशी देवाची लेकर प्रेम वाटताहेत ,त्याचा वारसा  व मानवाचे मुळातले संस्कार अजूनही त्याच्यात आहेत अन म्हणुच अच्छाई जिंदा है और रहेगीं!😌

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल