बाबा ची बदललेली रूप
आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल. आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय अस एका अभ्यासा द्वारे दिसून आलय. खरच अस झालय कारण लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा आणि आत्ता बाबा आणि मुलां मधले संवाद बदललेत ,नात अधिक जवळच झालय .आज त्याच सगळ्या प्रवासातल्या स्टेजेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिले म्हणजे लाॅकडाऊन सुरू झाल तेव्हा बाबा स्वत:शी काय बोलतोय ते बघुया( याला अपवाद आहेत जे बाबा मुलांना जास्त धाकात ठेवत नाहीत , त्याच्यां जवळ,सोबत असतात.) " हरवलेला मी" यात बाबा म्हणतोय मी ही हसायचो वाटत कधी कारण दिसतात गालावर दोंन्ही बाजूला हसल्यावर पडणारया खळ्या मीही असायचो कुंटुबाचा पार्ट दिसतोय फोटों मध्ये ,जुन्या कपाटात खेळायचो मीही बदाम सात, चौकट ,कँरम अन रंगायचे चेस चे डाव माझ्या सोबतही हो आठवतय पु...