आपल्या दैनंदीन जीवनात ऐणारया व्यक्ती,प्रसंग भावना ,अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न.
बाबा ची बदललेली रूप
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.
आण
आज किचनच्या खिडकी समोरच बुलबुल ची जोडी सारखा गोंधळ घालत होति , एक उडून जायचा तर दुसरा यायचा ,मग पानांन खाली हालचाल दिसली तर नुकतर घरट बांधायला घेतल्याच दिसल.फांद्याच्या त्रिकोणात ,गवताचे धागे विणत हे सुरू झाल . येव्हाना बरयाच पक्ष्यांच्या घरट्यांची माहिती झालिय त्यात सुगरण बाई आणि शिंपी यांच काम जरा जास्तच किचकट ,जिद्दीच व सुबक असत . तर कावळा ,सांळुखी ,पारवा ,चिमणी यांच आपल काटक्या ,वाळलेले गवत , कापुस कोंड्याच्या फळातला कापुस वा धागे अस जे अवेलेबल असेल त्यातुन अंडी देण्यासाठी सोईच अस घरट असत. बुलबुलच पण बारीक, लांब गवताचे वाळलेले धागे सद्रृष्य पाते विणुन जरास उथळ वाटी सारख घरट मी माझ्याNisarg thewa japuya gadya या चँनल वरच्या सुरूवातिच्या व्हिडीओज मधे चिकुच्या ,लिंबाच्या झाडावरच्या घरट्यांचे फोटो टाकले होते. पण खिडकितुन दिसणार घरट बघुन जरी आनंद झालाय तरी येणारया अंड्याच वा पिल्लांच भवितव्य धोक्यात आहे कारण ते मांजरींच्या सहज नजरेस पडणार व त्यांना पोहचायला अगदीच सोप्प आहे. ...
दुरितांचे तिमीर जावो |विश्व स्वर्धम सुर्ये पाहो|| किती सुदंर आहे ना ,ग्यानेश्वरांनी पसायदानात लिहीलेल ,माडंलेल हे. खरतर विचार,लिखाण या गोष्टी सुदंर आहेत तर त्या आपल्या सगळ्या साठी महत्वाच्या आणि आपल्या सर्वांच आयुष्य सुदंर करणारया. सारयांनचा निर्माता ताे परमपिता परमात्मा ,एकच आहे हे आपण ऐकतो, म्हणतो पण मानत नाही का? शाळेत असतांना म्हटली जाणारी प्रतिग्या ,"सारे भारतीय माझे बांधव आहेत,--------",किंवा शुभम करोती ,कल्याणम म्हणनारे आपण आपल विश्व इतक संकूचित करून टाकतो की आपल्या उंबरयाच्या बाहेर आपल कुणीच नाही असच वागत असतो. आपल्या कातडीचा रंगच तो काय वेगळा पण सारेच मानव म्हटले जाणारे दोन पायाचे प्राणी हाडामासाचे ,अंगात लाल रक्त ल्यायलेले,नाक कानाचा आकार वेगळा असला तरी सामान्य पणे त्यांची संख्या प्रत्येकात सारखीच. तरीही किती भेदभाव रंगाचा, जातीचा,धर्माचा ,देशाचा. प्रतेक जण ज्या कुठल्या देवाला मानतो तोही सर्वांवर प्रेमच तर करायला शिकवतो,माफ करायला शिकवत...
कौन बनेगा करोडपति च्या मंचावर आलेल्या काहि स्पर्धकां पैकी हे दोन शिक्षक ,त्यांची शैक्षणिक पात्रता वाखानण्या जोगी आहे पण तरिही त्यांना त्यांच्या विद्या दानाच्या कार्याचा मोबदला त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात मिळत नाही. आईवडिलांनी कष्टाने ,आपल्या पोटाला चिमटा देऊन उज्वल भविष्याच्या आशेने मुलांना शिकवले. पण या हाडाच्या शिक्षकांना त्या कामातुन कुटुंब चालवण कठिण होत . मग काही जोडधंदा वा प्रसंगी मजुरी करूनही त्यांना आपल्या कुटुंबाच्य उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो. का हि अवस्था व्हावी ? तर शिक्षण क्षेत्राला नफा देणारा धंदा बनवणारया /समजणारया शिक्षण सम्राटानां जसा विद्यार्थ्यान कडून फी च्या रूपात गडगंज पैसा लाटायचा असतो तसाच शिक्षकाची नोकरी देण्यासाठी त्यांच्या कडून लाखो रूपये घेतले जातात. मग येवढा पैसा देणारा कर्मचारी शिक्षक म्हणून नोकरी करत नाही तर ते पद त्याने विकत घेतलेल असत आणि सहाजिकच त्याला या पैशाच तिळमात्र ही द्यान नसत आणि शिक्षण देण्याची तळमळ तर नसतेच ,ते फक्त मस्टरवर सहि करणारे नामधारी...
Comments
Post a Comment