नव्या वाटेवर

            Hiii😊 बरयाच दिवसात काहीच लिहील नाहीय न? हो नाहीच लिहीलय 😒 नवीन कारभार म्हणजे नवा उद्योग करत होते. I mean पैसे मिळवण्या साठी चा नाही तर असच परत आपल्या सिमे पलिकडे पाऊल टाकायचा प्रयत्न. म्हणजे जसा चाचपडत ,सुधारणा करत ब्लाॅग लिहायला घेतला तसच YouTube Video बनवत होते .प्रयत्न करतेय, आजूबाजूचे पक्षी निरीक्षण त्या चॅनलवर टाकतेय. असच लाॅकडाऊन मध्ये कुणीतरी खिडकीतून दिसणारया पक्ष्यांचे व्हिडीओ बनवून लहान मुलांना माहीती द्या अस आवाहन केल आणि मग सुरू झाला एक नवा शोध उत्साह बागेतल्या झाडांवर ,आजूबाजूला,  अंगणात दिसणारया पक्ष्यांचे फोटों व्हिडीओ काढन. त्यांची माहीती मिळवण . आश्चर्य म्हणजे या शोधात टिव्हीवर किंवा पक्षी संग्रहालयात बघायला मिळणारे पक्षी बागेतल्या झाडावर दिसायला लागले. त्यांची नाव माहीती करण्या पासून सुरूवात होती .वेडच लागल .वेळ कसा जातोय कळतच नव्हत. हे सगळ तरी सोप्प होत पण ते व्हीडीओ YouTube वर टाकायला त्यांच मिक्सींग ,एडीटींग त्यांच योग्य प्रकारे प्रेसेंट करण या सगळ्या गोष्टी म्हणाव्या तितक्या सोप्प्या नाहीत .तरी Google बाबा आणि स्वत: YouTube सारखा हुरू आहे म्हणून एक एक पायरी शिकत सुधारणा करत चालूय सगळ. आत्ता सुरू केलय तेही बालीशच वाटतय पण-------- हार मानायची नाही अस स्वत: लाच बजावलय. तर या माझ्या नव्या प्रवासात तुम्हालाही सहभागी करून घेईल भविष्यात (हो! हे ही कोण? केव्हा ?वाचेल माहीत नाही) तुम्ही हे वाचाल तोवर मी माझ्या दोन्ही आघाड्यांवर प्रगती झालेली तुम्ही बघाल. अच्छा आत्ता लिखान नियमीत करेल बर का😃 कारण ते बाळ आत्ता हळूहळू बाळस धरायला लागलय म्हणून मी हि आघाडीही योग्य प्रकारे सांभाळेल आत्ता. हो माझ्या YouTube channel च नाव आहे"निसर्ग ठेवा जपूया गड्या" मग जपणार ना निसर्ग ठेवा आपण सगळे मिळून.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल