आनंदाच दान (Smile 😊please)

आज सगळी कडे चिंतेच वातावरण आहे, कुठे मरणाची भिती तर कुठे नोकरी -धंदा गमावण्याची, तर कुठे आपल्या माणसानां गमावण्याच दु:ख. हे सगळ जरी असल तरी निरागस मन ,कुठल्याही काळजी शिवाय जगणार बालपण एक आनंदाची ,हास्याची लकीर आपसूकच ओठावर घेऊन येत. न कसली चिंता न फिकीर .पोट भरल, झोप झाली की बास ही आपली हसतच असतात वर ती थोडही रडली की आपण त्यानां हसवण्या साठी काय ? काय ? करतो. पण लहान मुल कसही असल अगदी बाळकृष्णा सारख लोभस किंवा शेंबड कळकट तरी त्याच्या निरागस चेहरया कडे बघून आपले ओठ हास्य लकीरी साठी जरा लांब होतातच. किती लोभस असत ना हे हसू .विशेषत: मुलांच्या बाबतीत. त्यात कुठलाही देखावा ,वरवरच ,नाटकी अस काही नसत. खरतर अनोळखी मुल ही, आपण रस्त्याने जाताना त्यांच्या कडे बघुन नुसती भुवई उंचावून काय ? अस इशारयाने विचारल तरी काही लाजून तर काही बिंधात स्माईल 😊 देतात. अस मोठ्याच्यां बाबतीत नाही होत, ते आपल्या ओळख दाखवण्याचे तर्क काढत बसतात . पण यातही खेड्यात शेतात जाणारया बायका पटकन स्माईल देतात हा माझा अनुभव आहे. असो ,तर एखादयाच्या गालावर हास्य फुल...