आनंदाच दान (Smile 😊please)

   आज सगळी कडे चिंतेच वातावरण आहे, कुठे मरणाची भिती तर कुठे नोकरी -धंदा गमावण्याची, तर कुठे आपल्या माणसानां गमावण्याच दु:ख.

    हे सगळ जरी असल तरी निरागस मन ,कुठल्याही काळजी शिवाय जगणार बालपण एक आनंदाची ,हास्याची लकीर आपसूकच ओठावर घेऊन येत.

न कसली चिंता न फिकीर .पोट भरल, झोप झाली की बास ही आपली हसतच असतात वर ती थोडही रडली की आपण त्यानां हसवण्या साठी काय ? काय ? करतो.

 पण लहान मुल कसही असल अगदी बाळकृष्णा सारख लोभस किंवा शेंबड कळकट तरी त्याच्या निरागस चेहरया कडे बघून आपले ओठ हास्य लकीरी साठी जरा लांब होतातच.

किती लोभस असत ना हे  हसू .विशेषत: मुलांच्या बाबतीत. त्यात कुठलाही देखावा ,वरवरच ,नाटकी अस काही नसत.
खरतर अनोळखी मुल ही,  आपण रस्त्याने जाताना त्यांच्या कडे बघुन नुसती भुवई उंचावून  काय ? अस इशारयाने विचारल तरी काही लाजून तर काही बिंधात स्माईल 😊 देतात.
अस मोठ्याच्यां बाबतीत नाही होत, ते आपल्या ओळख दाखवण्याचे तर्क काढत बसतात . 
पण यातही खेड्यात शेतात जाणारया बायका पटकन स्माईल देतात हा माझा अनुभव आहे.
असो ,तर एखादयाच्या गालावर  हास्य फुलवण हे त्याला व स्वत:लाही आनंदाच दान देण्या सारखच असत.
मग तुमची एखादी कृती,एखादा विचार किंवा  तुमची कुणितरी  वा तुम्ही कुणाची तरी काढलेली  फक्त आठवण आनंदाच लेण ठरते.
तस आनंदाची कारण प्रत्येकाची वेगळी वेगळी 
सोनेरी पहाट आनंद
वारयाची झुळुक आनंह
मंदीरातिल अभंग आनंद
मस्जिदीतिल अजान आनंद
चिमण्यांची चिवचिव आनंद
कोकीळेची कूहू--आनंद
गाईचे हंबरणे आनंद
मातिचा सुगंध आनंद
पावसाचा थेंब आनंद
इंद्रधनुचे रंग आनंद
                        भाकरीचा भुकेल्या आनंद                                                                                                                                               तहानलेल्या जल आनंद                                                     "आई" हाक आनंद                                            बाबा माझा आधार आनंद    
नात्याची सांगड आनंद
"बी"चे रूजने आनंद
कळीचे उमलणे आनंद
झाडाचे बहरणे आनंद
लेकराचे हसू आनंद
श्रमा अंती झोप  आनंद
चांदन आनंद
उगवतिचा सुर्य आनंद
दिस आनंद
रात आनंद
बस त्याचा ध्यास आनंद
आनंद,आनंद
तुझा-माझा आनंद
काय,कसला, आनंद कुठे कुठे आनंद .जवळच असतो खरतर तुमच्या आतच असतो तो.मग त्याला बाहेर शोधन नकोच. वर तो कशावरही अवलंबून न राहिलेलाच बरा.सदा हसर असण हे तुमच्या स्वत:साठी व तुमच्या संपर्कात येणारया सगळ्यां साठीच उत्तम औषध म्हणा किंवा मनाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवणार इम्युनिटी बुस्टर ठरत.
काहींचा चेहरा सततच आनंदी असतो म्हणजे कधिही त्यावर रागाची ,दु:खाची एक छटाही दिसत नाही तर काहींच सततच कोपिष्ट मुख ,इतक की त्या माणसाशि बोलायला ,त्याच्या समोर जायलाच मुळी भिती वाटते तर काही सदा चेहरयावर कसलेही भाव नसलेले.
खर नेहमीच आनंदी राहण सगळ्यानांच जमत अस नाही पण आपण तस राहाव याची जाणीव होऊन तसा प्रयत्न करण ,मनाला त्या साठी प्रोग्रॅम केल की ते वळत त्या आनंदाच्या वाटेवर. मग सतत तुम्ही आनंदाचे दाते ठरता आणि तुमच्या समोर येणारया व्यक्ती, कॅमेरामनने" स्माईल प्लीज " अश्या दिलेल्या आवाहना सारखी पुढ्यात.येताच स्माईल देतेच.
मग आनंदात न्हाऊया आणि न्हाऊ घालुया.या चित्रातल्या सखी सारख.



 

                         

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल