तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे
प्रश्न असा आहे कि विद्वानातला विद्वान उत्तर देऊ शकणार नाही ,अथवा कुणीही सामान्य माणूस उत्तर देऊन टाकेल कि तो सगुणच आहे ,त्याचे हे गुण दिसतातच की आपल्याला सृष्टीच्या चराचरात,तोच तर सुर्याला आपल्या साठी लाली देऊन नवी प्रभा आणतो,
पानांफुलांत कित्ती कित्ती रंग भरतो.प्रत्येकाचे वेगळे रूप ,वेगळे गुण .त्याला कित्ती वेळ लागला असेल हे सगळ निर्माण करायला ,म्हणजे विद्न्यान वादी लोकांन च्या दृष्टीने हे निरर्थक असेल ,त्याचे वेगळे विद्न्यान असेलही पण या निर्मीतीत अस काही आहे जे मानवाच्या (आत्ताही)अवाक्या पलिकडचे आहे.त्या जगनिर्मात्या ,सृष्टीकर्त्या परमेश्वराच्या रचनेत पंचतत्वां चे विशिष्ट स्थान आहे ,त्यात जल ,पाणी ,नीर हे आपना सर्व सजीवांचे जीवन आहे ,त्याचे ही चक्र वेगळे ,पाऊस, नद्या ,झरे ,धबधबे ,समुद्र
ठाई ठाई माणसाने नतमस्तक व्हावे अशी निर्मिती.त्याच्या निर्मितीतल्या प्रत्येकाचे वर्णन करणे केवळ अशक्य.ते चित्रकाराच्या चित्रात बंदिस्त होत नाही कि कविच्या कवितेत . आकाशातले रंग वेगळे
रंग धरणिचे वेगळे,गर्द हिरव्या वनराईचे ,अन पानोपानी रांगोळीचे,रंग पाण्याच्या तुशारांचे,रंग झरयाच्या पावित्र्याचे,रंग नदीच्या अवखळ असल्या जलधारेचे,रंग समुद्राच्या निळ्यात्या अवकाशाच्या प्रतिबिंबाचे.

रंगात या सारया रंगणारया त्याच्या सुदंर लेकरांचे ,म्हणजे आपणच ,मानव ही ही त्याची सुंदर ,युनिक निर्मिती.त्यातही किती वैविध्य.
आपले रंग , नाकी- डोळी,आचार -विचार ,एक न मिले दुसरेसे,असच नाही का आपले बोटांचे ठसे ही प्रत्येकाचे वेगळे.
घरात चार गोष्टी वेगळ्या केल्या की आपण थकतो ,कारखान्यांन मध्ये निर्मिती होते त्या गोष्टींही साचे बंध्दच असतात कि नाही.
बस वो एक ही जो सबको "युनिक" बनाता है.
मग परत एकदा प्रश्नच, "तुज सगुण म्हणुकी निर्गुण रे"
Comments
Post a Comment