डॅशिगं लेडी

तर अशिच ही स्पेशल ,तुम्हि म्हणाल काय येवढ तिच्यात ? मी तिलाच डॅशिगं अस संबोधलय.
आज हि एका ग्रृप मध्ये होती ज्या "जनधनच "खात उघडायला आल्या होत्या ,चारपाच बायका असतिल .मस्त आपला नंबर येण्याची वाट बघत झाडा खाली बसल्या होत्या .हसण चालू होत.गप्पा चालू होत्या त्यांच्या भाषेत , वंजारी बोली आहे त्यांची,लोंणज त्यांच गाव.
"आधार कार्ड", "मतदान कार्ड " यांची जमवा जमव चालू होती. यातली एक गटप्रमुखाच्या रोल मधे.शिकलेली एकही नाही पण आत्मविश्वास शिकलेल्यानां लाजवेल असा.
लाॅकडाऊन मध्ये काहीनां दर महिन्याला 500 रू. जाहीर केलेय सरकारनी आणि तिच मिळवण्या साठी या आल्या होत्या.
त्यांच एकंदरीत काय चालूय हे बघतानां मजा वाटत होती.त्यांच्या बेफीकीर वृत्तीची ,बिनधास्तपणाची म्हणजे पैसा कमी असेल किंवा लाॅकडाऊन मुळे नसेलही काहीं जवळ कदाचित न दु: ख ,न चिंता ,न आपल काही लपवण्याची वृत्ती मस्त अपनी धुन मे . करोनाच सावट त्यांच्या आजूबाजूला नावालाही नव्हत(ते चुकिचच आहे )
तर अश्या या सख्यांना बघून मी आपल्या लिखाणाचा विषय शोधत गेली त्यांच्या जवळ ,दोॆघीनां मास्क दिले आणि आपल्या फोटोतल्या आजीना विचारल ,तुमचा फोटो काढू का?
आजीनी विचारल ,"कशाला पाहीजे बाई ?" मग मी म्हटल तुमचा ड्रेस छान आहे ,असे वेगवेगळे फोटो काढून लिहते तुमच्या बद्दल थोड. तर दुसरी आजी म्हणाली ,"काढा बाई "
मग कसा तरी पदर निट डोक्यावर घेत आजी सावरून बसली आणि मला ही पोज दिली.थॅक्यु आजी म्हणत मी माझ्या मार्गाला लागले.
पण घरी आल्यावर सहजच विचार आला, कि मी एखादया शिकल्या सवरल्या बाईला विचारून फोटो काढला असता तर येवढ्या सहज मला परवानगी मिळाली नसती. पण कुठलेही आढेवेढे न घेता किंवा त्या साठी मोबदला वा इतर काही अपेक्षा न ठेवता अगदी सहज मला छान ,निरागस भाव असलेला फोटो मिळाला .
तिची ही बिनधास्त वागणूक मझ्या साठी तिचा डॅशिंग नेचर ,गुण दर्शवत होती म्हणून मेरे लिए ओ सही में "डॅशिंग लेडी".
Comments
Post a Comment