शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल
कौन बनेगा करोडपति च्या मंचावर आलेल्या काहि स्पर्धकां पैकी हे दोन शिक्षक ,त्यांची शैक्षणिक पात्रता वाखानण्या जोगी आहे पण तरिही त्यांना त्यांच्या विद्या दानाच्या कार्याचा मोबदला त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणात मिळत नाही.
आईवडिलांनी कष्टाने ,आपल्या पोटाला चिमटा देऊन उज्वल भविष्याच्या आशेने मुलांना शिकवले. पण या हाडाच्या शिक्षकांना त्या कामातुन कुटुंब चालवण कठिण होत . मग काही जोडधंदा वा प्रसंगी मजुरी करूनही त्यांना आपल्या कुटुंबाच्य उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो.
का हि अवस्था व्हावी ?
तर शिक्षण क्षेत्राला नफा देणारा धंदा बनवणारया /समजणारया
शिक्षण सम्राटानां जसा विद्यार्थ्यान कडून फी च्या रूपात गडगंज पैसा लाटायचा असतो तसाच शिक्षकाची नोकरी देण्यासाठी त्यांच्या कडून लाखो रूपये घेतले जातात.
मग येवढा पैसा देणारा कर्मचारी शिक्षक म्हणून नोकरी करत नाही तर ते पद त्याने विकत घेतलेल असत आणि सहाजिकच त्याला या पैशाच तिळमात्र ही द्यान नसत आणि शिक्षण देण्याची तळमळ तर नसतेच ,ते फक्त मस्टरवर सहि करणारे नामधारी शिक्षक म्हणून शाळेत येतात . विद्यार्थ्याशी त्यांचा काडिचा संबध नसतो.
मग खरे पात्र शिक्षक गोल्ड मेडलिस्ट,Phd धारक कुठे तरी कोपरयात मुलांना शिकवत असतात तेही कवडीमोल मोबदल्यात.
वर दिलेली चित्र प्रतिनीधिक आहेत . अशे बरीच शिक्षक आपल्या ग्यानाच योग्य मोल आपल्याला मिळेल या प्रतिक्षेत आहेत .
सगळी कडेच अनागोंदी चालुय मग हे क्षेत्र तरी कस सुटेल ?
पण जिथे भविष्यातल्या नागरिकांची पायाभरणी होते ते पवित्र विद्येच मंदिर तरी यातुन सुटायला हवय नाही का?
Comments
Post a Comment