बुलबुल च बांधकाम


 
  आज किचनच्या खिडकी समोरच बुलबुल ची जोडी सारखा गोंधळ घालत होति , एक उडून जायचा तर दुसरा यायचा ,मग पानांन खाली हालचाल दिसली तर नुकतर घरट बांधायला घेतल्याच दिसल.फांद्याच्या त्रिकोणात ,गवताचे धागे विणत हे सुरू झाल . येव्हाना बरयाच पक्ष्यांच्या घरट्यांची माहिती झालिय त्यात सुगरण बाई आणि शिंपी यांच काम जरा जास्तच किचकट ,जिद्दीच व सुबक असत .

      तर कावळा ,सांळुखी ,पारवा ,चिमणी यांच आपल काटक्या ,वाळलेले गवत , कापुस कोंड्याच्या फळातला कापुस वा धागे अस जे अवेलेबल असेल त्यातुन अंडी देण्यासाठी सोईच अस घरट असत.

     बुलबुलच पण बारीक, लांब गवताचे वाळलेले  धागे सद्रृष्य पाते विणुन जरास उथळ वाटी सारख घरट मी माझ्याNisarg thewa japuya gadya या चँनल वरच्या सुरूवातिच्या व्हिडीओज मधे चिकुच्या ,लिंबाच्या  झाडावरच्या  घरट्यांचे फोटो टाकले होते.

         पण  खिडकितुन दिसणार घरट बघुन जरी आनंद झालाय तरी येणारया अंड्याच वा पिल्लांच भवितव्य धोक्यात आहे कारण ते मांजरींच्या सहज नजरेस पडणार व त्यांना पोहचायला अगदीच सोप्प आहे.

        तर या बुलबुल ला ति जागा रिजेक्ट करायची बुद्धी होवो आणि उद्या ते दुसर कुठे तरी आपला" आंशिया " बनवायचा विचार करोत या आशे सोबत आजच्या (विंडो) पक्षी  निराक्षणाला  विराम .

Comments

Popular posts from this blog

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल