आजच्या खरया कर्मयोग्यांना पत्र

 तिर्थस्वरूप ,
 खरतर इथे द्यायला आजहि  अनेक नाव आहेत . त्यात आमटे कुटुंब असेल , नाम फाऊंडेशनचे कार्यकरते (नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे --),पाणी फाऊंडेशनची मंडळी (अमीर खान ,किरण राव,सत्यजीत भटकळ), अरविंद जगताप ्मेधा पाटकर ,अन्ना हजारे,राहत फाऊंडेशन,दिपस्तंभ फाऊंडेशन,सिंधू ताई सपकाळ,डाॅ कोल्हे दांपत्य ,रेणू दांडेकर ------हि यादी बरीच मोठी आहे 😌 यात येणारया सर्वच मला ध्न्यात असणाा नसणारया सगळ्यांच दिग्गज, सेवा परमोधर्म मानणारया ,प्रेरणास्त्रोत व्यक्तिंना साष्टांग नमस्कार🙏
     तर पत्र लिहीण्यास कारण कि ,
 परत एकदा,😄 वर्तमान पत्रातल्या पत्र विषयक लेखांत उल्लेख केलेली  अरविंद जगतांपानी एका कार्यक्रमात "पत्र लिहीण्यास कारण की "  च्या उपक्रमातून अनेक पत्र लिहीली ( प्रेक्षकांना ऐकवली) त्यात डोळ्यांतून पाणी आणनारी ,हसवणारी ,कृतकृत्य करणारी,जागवणारी,नवी दृष्टि देणारी,ओळख करून देणारी आणि बरच काही शिकवणारी पत्र होती .त्याचाच संदर्भ घेऊन वाटल की या सगळ्यांना मला भेटता येणार नाही(लगेच नाही पण नक्कि भेटेन) पण त्यांच्याशी संवाद साधता येईल .ज्यांचे ईमेल आय डी मिळाले त्यांच्यातिल काहींना  लिहिलीत पत्र काहिंची उत्तरही मिळालीत.पण ज्यांना त्यांच्या कामा बद्दल ,काय म्हणाव बर appreciate  करायच होत कि शुभेच्छा द्यायच्या होत्या कि धन्यवाद द्यायचे होते त्यांच्या कामामुळे ज्यांच जीवन सुखकर झाल होत त्या सगळ्यांच्या वतीने कि ते अनेकांची प्रेरणा होतायेत त्यांच्या वतिने कि तुम्ही सगळे चांगूलपणावरचा  आमचा विश्वास कायम ठेवायला कारण ठरतायेत म्हणून.यातल कुठलही कारण चालेल नाहीका?
      तर तुम्हा सगळ्यांनाच नमस्कार ,
मी वर्तमान पत्रांमधून तुम्हाला तुमच्या कामाला ओळखणारी एक सामान्य गृहीणी.मला हि तुम्ही करत असलेल्यां कामाबद्दल जसा आदर आहे तसच मी हि यातल्या कुठल्या तरी कार्याशी जोडली जावी त्या कामात माझाही सहभाग असावा अस वाटत असत.पण -----
   असो प्रश्न असा आहे की आपण सगळेच अभ्यासू , तध्न्य ,कष्टाळू ,सातत्याने काम करणारी मंडळी अचानक लाॅकडाऊन झाल्या सरशी स्वत: ला ब्लाक केलय का? मला माहित आहे सगळेच फोटो काढण्या साठी काम करत नाहीत तरी जस अक्षय कुमार,सोनू सुद,राहत फाऊंडेशन वा ईतर समाजसेवि व्यक्ती वा संस्था यांच्या कार्या बद्दल ऐकल, वाचल तस तुम्हीही काही तरी केलच असणार पण या गोष्टी घडू नये म्हणून  करता आल असत याचा नंतर  (सरकारचा विरोध करायचा म्हणून नाही तर) गाजावाजा करण्या पेक्षा आधिच त्या साठी तयार होता आल नसत का?
       लाॅकडाऊन मध्ये जास्त प्रभावित झालेले स्थलांतरीत कामगार,हातावर पोट असणारे फेरीवाले , मोठ्या प्रमाणात भीक मागून पोट भरणारी मुलं,म्हातारे,स्रींया,दिव्यांग या संगळ्यान साठी ची व्यवस्था आधिच करता आलि नसती का?मला माहीत आहे हे सरकारच काम आहे पण आपण राम राज्यात राहत नाहीय याचीही जाणिव आहे .
     तरी काहीं ठिकाणी ग्रामपंचायती,जिल्हाधिकारी , कंपनी प्रमुखांनी योग्य वेळी योग्य पावल उचलली ,नियोजन केल म्हणून तिथले मजूरही तिथेच थांबले ,गरजूंच्या गरजा घरातच भागवल्या गेल्या आणि रोगाचा फैलावही थांबवण्यात यश मिळाले.
     तेव्हा अस वाटल की असा विचार जास्तित जास्त लोकं का करू शकत नाहीत?
      अनेक कामगार संघटना कामगारांच्या प्रश्नांवर भांडत असतात त्यांना या मजुरां पर्यंत पोहचून त्यांना आश्वस्त करता आल असतच की ,कि योग्य वेळी तुम्हाला घरी पाठवल जाईल किंवा काही दिवस योग्य सुविधा देऊन थांबवता आल असत का?
   कारण त्यांना गावाकडे काम नाहीय म्हणून तर ते घरदार सोडून आलेत ना?
    आणि येवढी फरपट झाल्यावरही परत येतायेत.
   मानवाच्या अवाजवी विस्तारवादाने निसर्गाचा ह्रास झालाय त्यामुळे नैसर्गिक आपत्ती साठी सदैव तयार राहणे आलेच तरी ते अचानक येणार संकट म्हणून थोपवता येण कठिणच पण आपल्या वैध्न्यानिक (scientific)प्रगतीचा , कम्युनिकेशन (संचार साधन)साधनांचा उपयोग करून जास्तित जास्त लोंकाना एकत्र करून जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहचवण कठिण असल तरी अशक्य नाहीच य?
  आपण सगळ्यांनिच डिजास्टर मॅनेजमेंट स्किलस् शिकण गरजेच आहे अस तुम्हाला नाही वाटत का ?
   या अंर्गत जशी पुण्यात मदत पुरवणारयांची एक साखळी होती,बाधीत प्रेताच्यां अंत्यविधी साठी ही साखळी होती .
   तशेच गट सदैव तयार असायला हवेत नाही का?
अन्न पुरवठ्या साठी घरा घरा तल्या अन्नपूर्णां चा गट. वैद्यकिय सुविधां साठी डाॅक्टरांचा गट, संवाद साधन्या साठि(दंगली वा जमावाला शांत करण्या साठी) प्रत्येक जाती धर्माचे पण शांती आणि एकते वर विश्वास असणारे वक्ते वा सुधारक, संरक्षणासाठी ट्रेन ,तडफदार स्री-पूूरूष ,निवारया साठी मोठी कार्यालय ,शाळा ,हाॅटेलस् उपलब्ध करून देऊ शकतील असे मोठे(पैसा व मनाने) लोकं.अस सगळ एका क्लिक वर . स्वप्न किंवा दिवा स्वप्न वाटाव अस आहे का हे ? पण मोठ मोठ्या यंत्रणा राबवल्या जाऊ शकतात आणि विशेष म्हणजे ज्या देशात बापूंच्या आवाहनावर सगळा देश ,लहान -थोर,स्त्रीयां-पुरूष ,गरिब-श्रीमंत अश्या संगळ्याानी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली नव्हे स्वातंत्र्य मिळवलच.
   मग हे स्वातंत्र्य अबाधित राहण्या साठी , देशातिल जनता सुखि ,सपन्न ,सुरक्षीत राहावि म्हणून सिमेवर लढणारया सैनिकां बरोबर आपण ही योगदान द्यायला नको?
   मी ,माझ च्या पलिकडे सगळे माझेच ,लोकं आणि देशही  व त्यांच्या साठी माझ ही काही कर्तव्य आहेच हे अगदी लहान पणीच मनानमनात रूजवता आल तर? परत एकदा आपला हॅपिनेस इंडेक्स वाढेल आणि मदति साठी भिक मागणारे  विकसनशिल देशाच्या लेवल च्या वर जाऊन विकसित(वैचारीक ,समानता या अंगानेही) देशांच्या यादीत तर येवूच पण कदाचित लोकजागृतीतून यंत्रणांवर ही दबाव येईल आणि एक  दिवस सर्व ट्रेन वेळेवर हा इतिहास न होता अश्या गोष्टी आपल्या देशाची ओळख होतिल .
    असो मी आपल पत्रात मांडल, तुमच्या कडून नाहीतर कुणा कडून अपेक्षा करणार.
   पण तरीही मनावर घ्याच थोड.
                                           तुमची  नेहमीच ऋणी
                                               सारू पवार
ता.क. : चुकलमाकल तर क्षमा असावि
मला ही तुमच्या सेवा कार्यात सहभागी होता याव ही ईश्वर चरणि प्रार्थना.
  

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल