Posts

Showing posts from September, 2021

भारत के युवा जाग जा

Image
  आहोत आपण सुखी पण सुख सांभाळाव लागत ते सांभाळण्या साठी सतत काही तरी नव नव कराव लागत असला समृध्द वारसा हे आपल भाग्य आहे करंटे  निघालो हे देशाच दुर्भाग्य आहे          " भारत के युवा जागजा" हमारे हवाले कर गये है वतन वो शहिद शहादत की उनकी क्या किमत नही झगडेगें आपस में तो, लड मरेंगे और जन्नत सा देश हमारा  फिरसे क्या गुलाम करेंगे युवा हो तुम, 'ताकद' देश की  सारे जहाँ मे न कोई इतने जवाँ है ठाँन लो के अब अपने देश की सेवा हम करेंगे सारे जहाँ में हम नाम अपने वतन का ऊँचा करेंगे  न केसरी ,न निला ,न हरा धरेंगे  हम हिंद के बच्चे है  बस हाँथ में यारों तिरंगा धरेंगे

आंधळा राजा ,"मतदार" आणि धूर्त लबाड लोकसेवक

Image
   आम्ही आंधळे नी मुर्ख चिकटवले लेबल जाती-धर्माचे अन घेतले झेंडे ,भगवे ,निळे अन हिरवे यातच हरवलो मग------- दिसलाच नाही कावा त्यांचा आपल्याला गुंतवून या गुंत्त्यात ते गले लठ्ठ झाले खाल्ल सार सार काही  चारा ,कधि डांबर , कधि रेती ,कधि राशन  कधि घर तर कधि शवपेट्या ही शहिदांच्या खाल्ल्या तुकडे टाकुन आश्वासनांचे ,  घोषणांचे आरक्षणांच्या  तर कधि मंदिरांचे आणि पुतळ्यांचे हे टाळूवरच लोणी खाऊ लागले आणि आपल्याला आपल्याच हक्कांसाठी भिकेला लावले किती दिवस जगणार आहोत हे गांधारीच जिन आपल्यातल्याच कुणाला तरी व्हाव लागेल कृष्ण!        कली युगातले हे कली आहेत पांढरे कपडे आणि काळी कर्णी   व्यवस्था झाली द्रोपदी आपल्यातल्याच काही युधिष्टिरांनी लावला तिच्यावर डाव जागा आत्ता तरी --+++ पट्टया काढा स्वार्थाच्या ,जाती -धर्माच्या खावू नका यांनी दिलेली  भेदभावाची गोळी आपल्याच तर मढयावर शेकताहेत  ते त्यांची राजकारणाची पोळी

नवा दिवस नवि आश

Image
  रोज नवे रंग लेऊन येते सकाळ नव्या आशेचा नवा प्रकाश रात्रीच्या उदरातून उगवणारा सुर्य अस्ताला गेलेल्या सकाळचे रंग हे चक्र असच चालणार असत तेच चक्र तर आपल्या ही आयुष्याच असत कधि दु:खं तर कधि सुखं ,येत जात राहतात रोजच नवे काही धडे देऊन जातात  शिकायच असच प्रत्येक धड्यात काही तरी त्याशिवाय ही जीवनाची परिक्षा देता येत नाही पडतो ,म्हणून तर उठायच शिकतो येणारा क्षण जाणारच तर असतो आज आहे ते उद्या काल होणारच तर असत अडचणि फार कुरवाळत बसायच नसत त्या सोडवून पुढे तर जायचच असत             अस करत करत तर             आयुष्याच गणित सुटत          कुठे वजाबकी तर कुठे गुणाकार होतो सरते शेवटी आयुष्याच्या फक्त शुन्य तेवढा उरतो

आपण बघे

Image
       कोकणातल्या दरडी कोसळण्याच्या घटना ,कोल्हापुर, सातारा भागातले पुर या आपल्या  महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी आणि याहि वर्षी घडलेल्या काही घटना .हे आपल्या भागात घडणार नाही असाच काहीसा समज इतर भागातल्या नागरिकांचा असावा ! नाही , तो असतोच ! मग ? आपण काही दिवस हळहळतो, यंत्रनेला दोष देतो , काहि लोक मनापासुन मदत करतात अगदि तन-मन- धनाने तर काहि फोटो, प्रसिध्दि किंवा आपले महान पण गायले जावे म्हणून  मदत करतात .     वरचा फोटो एका वर्तमान पत्रातला आहे जो ऐरविही दुर्घटनांची हिच कारण असतात हे दाखवतो . मग हि कारण गेल्या किती तरी वर्षां पासुन आपल्याला माहित आहेत म्हणजे मुंबई व पुण्यातल्या भयंकर पुराच्या वेळीहि तेच सांगितल गेल नदिपात्रात भर टाकणे ,अनधिकृत बांधकाम ,नाले/ गटारीं मधे बेशुमार अडकलेल प्लॅस्टिक , वृक्ष तोड,संपुष्टात आलेली खारफुटी व नदिकाठावरची संपवलेली झाड  , जी पुराला काही प्रमाणात अटकाव करू शकतात आणि पर्यावरणाचा असमतोल ज्या मुळे वातावरण व ऋतूचक्रात बदल घडतात.              या सगळ्यात पर्यावरणाचा असमतोल घालव...