आपण बघे

       कोकणातल्या दरडी कोसळण्याच्या घटना ,कोल्हापुर, सातारा भागातले पुर या आपल्या  महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी आणि याहि वर्षी घडलेल्या काही घटना .हे आपल्या भागात घडणार नाही असाच काहीसा समज इतर भागातल्या नागरिकांचा असावा ! नाही , तो असतोच ! मग ? आपण काही दिवस हळहळतो, यंत्रनेला दोष देतो , काहि लोक मनापासुन मदत करतात अगदि तन-मन- धनाने तर काहि फोटो, प्रसिध्दि किंवा आपले महान पण गायले जावे म्हणून  मदत करतात .

    वरचा फोटो एका वर्तमान पत्रातला आहे जो ऐरविही दुर्घटनांची हिच कारण असतात हे दाखवतो . मग हि कारण गेल्या किती तरी वर्षां पासुन आपल्याला माहित आहेत म्हणजे मुंबई व पुण्यातल्या भयंकर पुराच्या वेळीहि तेच सांगितल गेल नदिपात्रात भर टाकणे ,अनधिकृत बांधकाम ,नाले/ गटारीं मधे बेशुमार अडकलेल प्लॅस्टिक , वृक्ष तोड,संपुष्टात आलेली खारफुटी व नदिकाठावरची संपवलेली झाड  , जी पुराला काही प्रमाणात अटकाव करू शकतात आणि पर्यावरणाचा असमतोल ज्या मुळे वातावरण व ऋतूचक्रात बदल घडतात.

             या सगळ्यात पर्यावरणाचा असमतोल घालवायला काहि वर्ष नक्कीच लागतिल. त्या साठी सार्वत्रिक प्रयत्न गरजेचे पण ----  जी इतर कारण आहेत त्यांच निवारण केल तर बरयाच प्रमाणात या दुर्घटना कमी करता येतिल .

        आपण म्हणतो ते प्रशासनाच काम आहे . पण आपण असहि म्हणतो कि ,"गाव करेल ते राव काय करेल" हाच विश्वास व जबाबदारी आपण सगळ्यांनीच घ्यायची गरज आहे.

         अतिक्रमण करणारे नागरिक ,कचरा करणारे नागरिक ,वृक्ष तोडणारे नागरिक ,प्रशासन निवडणारे नागरिक आणि यातुन ज्यांच्या वाट्यला हे भोग  योतात ते भोगणारे ही नागरिकच-- 

        मग आपल्याला आपल्या कृतिंच आत्मपरिक्षण नको का करायला ?  छोट्या छोट्या गोष्टींच भान ठेऊन दैंनदिन व्यवहार केले तर  बरच साध्य करता येईल पर्यावरण रक्षणाच्या बाबतित म्हणायच तर कार्बन फूटप्रिंट्स कमी करून आँक्सिजन फूटप्रिंटस  जाणिव पूर्वक टाकावे लागतिल ,क्षणिक आळस व स्वार्थ बाजुला सारून.

            आपण जस आजारि पडू नये म्हणून प्रयत्न करतो कि आजार वाढल्या वर औषधांचा मारा .काय अधिक योग्य आहे? तुम्ही सुजाण नागरिक आहात ज्या जागृतिने वाईटावर बोट ठेवता  म्हणजे फक्त  लाईक्स,कमेंट्स करायला (सोशल मिडीया) मोबाईलवर तसच मतदान करतांना डोळसपणे बोट ठेवा ,चांगल्या माणसाला पाठिंबा द्या , कुठल्या ही प्रामाणिक लढ्यात एकट पाडू नका  आणि तमाशा बघणारे तर मुळीच होऊ नका .

      वेळ कधि सांगून येणार नाही मग," शेवटचा दिस गोड  व्हावा,"  म्हणून येणारा प्रत्येक दिवस शेवटचा समजून जे काय चांगल करता येईल ते कराच!  कारण शेवटी पैसा ,सपंत्ती नाही तर चांगली कर्मच तो दिवस गोड करतात.


 

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल