आंधळा राजा ,"मतदार" आणि धूर्त लबाड लोकसेवक
आम्ही आंधळे नी मुर्ख
चिकटवले लेबल जाती-धर्माचे
अन घेतले झेंडे ,भगवे ,निळे अन हिरवे
यातच हरवलो मग-------
दिसलाच नाही कावा त्यांचा
आपल्याला गुंतवून या गुंत्त्यात
ते गले लठ्ठ झाले
खाल्ल सार सार काही
चारा ,कधि डांबर ,
कधि रेती ,कधि राशन
कधि घर तर कधि शवपेट्या ही शहिदांच्या खाल्ल्या
तुकडे टाकुन आश्वासनांचे ,
घोषणांचे आरक्षणांच्या
तर कधि मंदिरांचे आणि पुतळ्यांचे
हे टाळूवरच लोणी खाऊ लागले
आणि आपल्याला आपल्याच हक्कांसाठी भिकेला लावले
किती दिवस जगणार आहोत हे गांधारीच जिन
आपल्यातल्याच कुणाला तरी व्हाव लागेल कृष्ण!
कली युगातले हे कली आहेत
पांढरे कपडे आणि काळी कर्णी
व्यवस्था झाली द्रोपदी
आपल्यातल्याच काही युधिष्टिरांनी लावला तिच्यावर डाव
जागा आत्ता तरी --+++
पट्टया काढा स्वार्थाच्या ,जाती -धर्माच्या
खावू नका यांनी दिलेली भेदभावाची गोळी
आपल्याच तर मढयावर शेकताहेत
ते त्यांची राजकारणाची पोळी
Comments
Post a Comment