नवा दिवस नवि आश
रोज नवे रंग लेऊन येते सकाळ
नव्या आशेचा नवा प्रकाश
रात्रीच्या उदरातून उगवणारा सुर्य
अस्ताला गेलेल्या सकाळचे रंग
हे चक्र असच चालणार असत
तेच चक्र तर आपल्या ही आयुष्याच असत
कधि दु:खं तर कधि सुखं ,येत जात राहतात
रोजच नवे काही धडे देऊन जातात
शिकायच असच प्रत्येक धड्यात काही तरी
त्याशिवाय ही जीवनाची परिक्षा देता येत नाही
पडतो ,म्हणून तर उठायच शिकतो
येणारा क्षण जाणारच तर असतो
आज आहे ते उद्या काल होणारच तर असत
अडचणि फार कुरवाळत बसायच नसत
त्या सोडवून पुढे तर जायचच असत
अस करत करत तर
आयुष्याच गणित सुटत
कुठे वजाबकी तर कुठे गुणाकार होतो
सरते शेवटी आयुष्याच्या फक्त शुन्य तेवढा उरतो
Comments
Post a Comment