We are the dumping ground for all that world can reject

 

   हे फक्त एक चित्र ,माझ्या म्हणन्या चा प्रत्यय यावा व चित्र बघुन वाचायची इच्छा व्हावी म्हणून .

       आज आपण भारतिय जे आपल्याच संस्कृतिचा, संस्कारांचा भाग आहे तेच अगदि फाॅरेन रिटर्न किंवा तिकडच लेबल लावून येत ते अंगिकारण म्हणजे पुढारले पण किंवा आधुनिक जीवनशैली आत्मसात केली अस मानतो.

   योगा हा भारताने जगाला दिला अस म्हणतात आणि ते खरच आहे. पण याची ओळख आपल्याला जास्त कधि झाली किंवा तो एक व्यायाम किंवा वर्कआऊट किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा भाग म्हणून आपण केव्हा स्विकारल तर जेव्हा इंटनॅशनल योगा डे साजरा व्हायला लागला तेव्हा .आता काही म्हणतिल कि आम्ही बरयाच वर्षां पासुन करतोय तर ते खरोखरीच जागृत नागरिक म्हणजे काय ट्रेंड आलाय म्हणून तस करतोय अश्यातले नाही तर ते माझ्या आरोग्या साठी उत्तम वा महत्वाच आहे म्हणून .

      खरतर योगा फक्त काही आसनांन पुरता मर्यादित नाही तर ती एक उत्तम जीवनशैली आहे. पर्यावरण पुरक ,संयमी ,संतुष्ट, प्रेरणादाई ,सेवा वा एंकदरीत स्व:कल्याणातून विश्व कल्याणाकडे नेणारा जीवन मार्ग  . ते कस? ते आज नाही परत कधितरी पाहू.

   आज खरतर मनात आल कि आपण किती अंधानुकरण करतो . मग ते पाश्चयात्यांच असो किंवा मग आपल्या काही जुन्या पण लाॅजीक नसलेल्या किंवा त्या मागच खर कारण न समजुन घेता अंगिकारलेल्या परंपराच.

     आपण सदसद् विवेकबुध्दीने वागतच नाहि का? म्हणून म्हणायच होत कि आपण डंपिगग्रांऊड होतोय . बघा डंपिग ग्राऊंड हा शब्द टाईप करताच काय आलं ते --

      

   हे जे काय आहे ते वस्तु ,संस्कार या सगळ्याच बाबतित आपल डपिंग ग्राऊंड झालय.

    करोना आल्यावर अनेक गोष्टी आपल्या आणि त्या कशा योग्य आहेत याची भली मोठी यादि समाज माध्यमांवर(Social media) फिरत होति .मग ते शेकहँन्ड ऐवजी नमस्कार असो किंवा बाहेरून आल्यावर बाहेरच पादत्राणे काढणे ,हातपाय धुणे असो  . यासाठी भविष्यातल्या अश्या  गरजा ओळखुन भविष्यातल्या घरां मधे परत पादत्राणे , हातपाय धुवायची मोरी वा बेसीन बाहेर कस करता येईल याचा विचार व्हायला लागला.

   आता हाताने जेवण्या बद्दल बोलुया .अस म्हणतात कि हातानि खाल्ल कि तृप्त झाल्या सारख वाटत .खर जेवण करायला बसल कि जेवणच कराव का ? म्हणतात तर जेवतांना पदार्थाच्या वासाने सुरूवात होते ,गरम गरम वरण भातावर तुपाचि मस्त धार टाकल्यावर जो काय मस्त सुगंध येतो ! काय आल न वरणभात आवडणारया मंडळिंच्या तोंडाला पाणी😋 ,नंतर मस्त हातानि तो कालवायला घेतला कि स्पर्षाची गम्मत आणि अस्सा घास पाच बोटांनि तोंडात टाकला कि वाह! मन आणि जिभ दोंन्हि तृप्त.
  हाच प्रत्यय या बेन वाईज ला आला .मी खरतर गम्मत म्हणून शोधत होते कि त्या लोकांच दैनदिन जीवन कस असत आणि त्यांना भारतिय संस्कृतितल काय आवडत तर हा ब्लाॅग सापडला.ऐरवि  आपण बरेच विदेशी भारतात येऊन लग्न करतात,काहि अध्यात्मिक अभ्यासा साठी(The monk who sold his ferrari या राॅबिन शर्माच्या पुस्तकात याचा प्रत्यय येतो.),निसर्गोपचारां साठी ,योगा व आयुर्वेदा साठी व काहि मग पर्यटक म्हणून येतात. यात काहि आपल्या देशाच्या प्रेमात पडतात आणि येतच राहता किंवा इथलेच होऊन जातात.   काही नृत्य, काहि संगीत साधना करत याच मातिच्या रंगात रंगून जातात . अगदि पांडुरंग रंगी रंगलेले गोरे पण आपण आषाढी दरम्यान पाहिले ,ऐकले.
       मी काहि कट्टर हिंदुत्ववादी किंवा कट्टर संस्कृति वादी बीदी नाहीय . कट्टरवाद आला कि आपला एक तर तालीबान होतो नाही तर सनातनि(दाभोळकरांच्या हत्त्याकांडात सामिल असल्याचा ज्या कोणि कट्टर वाद्यांवर आरोप आहेत ते) होतो.मी आता कुठे काय करायच आणि काय नाही किंवा काय कशासाठी करायच या गोष्टींचा पूर्ण विचार करून करतेय. 
    मी फार काहि मोठी नाहीय कि माझ्या या गोष्टिंना कुणि महत्व द्याव .पण-------
    हा पण शांत बसू देत नाही आणि यातून वाटल कि आपलि मुलं त्या लोकांच स्वावलंबन शिकत नाही पण स्वातंत्र्याच्या  नावा खाली स्वैराचार मात्र करायला लागतात काहिनां तिकडे बंधनां शिवाय जगता येत म्हणून तिकडे जायच असत .पण तिकडचे नियम मग ते टॅक्स भरण असो कि स्वच्छतेचे मापदंड असोत ,वाहतुकिचे नियम असोत कि आणखि काही.या गोष्टि भारतात आल कि' चलताय ' या सबबी खाली आनंदि आनंद असतो.
        आपल त्यांना जस काहि आवडत आणि ते ते स्विकारतात तसच आपल्यालाही त्यांच काही आवडण्यात गैर नाहीच.
      पण ते काय आवडत व आपण ते कस स्विकारतो याच भान असायला नको का?
  आपण सगळ चांगल इतरांनि कराव व आपण फक्त उपभोग घ्यावा यातुन बाहेर कधि येऊ कुणास ठाऊक.
    कदाचित डंम्पिग ग्राऊंड वर काहिच डंम्प करायला राहणार नाही तेव्हा कि, आपल सगळ तिकडे गेलेल वेगळ्या वेश्टनात वेस्टनाईज होऊन येईल तेव्हा?????
     खाली याच संदर्भात तिकडच्या काहिंनी लिहिलेल ते टाकतेय.ओरिजन वाचायचा नक्की प्रयत्न करा कदाचित त्या चश्म्यातून अधिक स्पष्ट होईल ते.


            





Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल