पंढरीची वारकरी

शांत आणि जरा गुढ वाटणारया आजीबाईंनां बघून त्यांच्या बद्दल जाणून घ्यावस वाटल आणि जरा लिहायचा प्रयत्न चालू आहे म्हणून त्यानां न विचारताच फोटो काढला. ऐरवी म्हातारया माणसानां जरा बोलायच असत ,कुणि विचारपूस केली तर ते भरभरून बोलतात.यांच जरा वेगळच होत . त्यांच्या कडे बघून हसल तरी त्या फारसा रिस्पाॅन्स देत नव्हत्या . जनरल डब्बा होता म्हणून अंदाज लावण कठिणच होत कि त्यांची परिस्थीती नेमकी कशि आहे.थंडीचे दिवस होते तेव्हा अगदी गुंडाळून बसल्या होत्या मग मी सवईने बँगेत नेलेली एक शाल त्यांना दिली तर ती त्यांनी सिट खालची वायरची पिशवी काढून त्यात ठेऊन दिली वर चेहरा परत तसाच निर्विकारी. थोड्या वेळाने चहा वाला आला तर आजींनी त्याला एक चहा मागितला ,त्याने पैस्...