ब्लेम गेम

   लाॅकडाऊन मुळे होणारी स्थलांतरीत मजूरांची फरपट आपण सगळेच वर्तमानपत्र आणि विविध वाहिन्यांनवरील बातम्या मधून बघतो . आपल्या विकासाच्या कल्पनांवर प्रश्नचिंन्ह ठरावि एवढी विदारक स्थिती ,बायका काय अन लहान मुलं काय सगळ्यांचीच अवस्था मानवी मनाला चटका लावणारी.
  हो पण सुरूवातिचे काही दिवसच असा भावनिक कमेंटस् चा पाऊस पडला जिथे आपल्या संवेदनशिल मनाचा देखावा आपण केला.आत्ता काय ते त्यांच बघतिल ,कुठे कोणी कस जाव हे ज्याच त्यानी ठरवाव .आपण आत्ता लाॅकडाऊन मुळे बोर झालो म्हणून ते कस शिथील कराव ,व्यायाम करता यावा,थोडफार शाॅपिंग करता याव,पार्लरस् उघडावित, विजबिल माफ कराव या आपल्या"माफक" फिकीरीत सध्या बिझी आहोत.
     खरतर असच असण सोॆईच आहे कारण मी एकटा/एकटी काय करणार अस म्हणून आपण आपल्या विश्वात सगळी सुख उपभोगत आलोत आणि राहूही. त्यात त्या नाहीरे वर्गाचा सगळा मक्ता सरकार वा सामाजिक संस्थानीं घ्यावा असच जणू गृहीत धरल जात.
     वर सल्ले देत सुटतो, सरकार चे निर्णय कसे चुकिचे आहेत, काय नियोजन व्हायला हव होत .
     आपण नागरीक वा एक माणूसकी असलेले लोक म्हणून काय करू शकतो किंवा करू अस काहीच च करत नाही (काही सन्माननिय अपवाद वगळता .)
     मजुरानां त्यांच्या राज्यात पोहचवण्या वरून आत्ता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.काय हा बालिशपणा
म्हणायचा की गलिच्छ राजकारण.
      लाॅकडाऊन अचानक केल गेल आणि लोकांना आहे तिथे थांबण्यास सांगितल गेल पण नंतर करोनाचि वाढती व्याप्ति लक्षात घेता या लाखोंच्या संख्येने असणारया लोकां पर्यतं त्यांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची व्यवस्थी केली जाईल हा संदेश आणि विश्वास त्यांच्या पर्यंत पोहचवता आला नाही?
    रस्त्यांनि जाणारे लोंढे जसे पत्रकारांना दिसत होते तसे  ते कामगार चळवळींचे नेते किंवा छट पुजेचा इव्हेंट करून मुंबईत राहणारया लेकानां मत मागणारया त्या मजूरांच्या स्थानिक नेत्यानां दिसले नाहीत?
    म्हणजे तुमच्या जाण्याची योग्य सोय केली जाईल अशी आश्वासन वा विश्वास त्यांना देता आला नाही. काही लोकांनी खासगीतन या पैकी काहीचीं जाण्याची व्यवस्था केलीच कि.
    ईच्छाशक्तित अफाट शक्ति असते जी हजारो किलोमीटर पायी चालत जाऊन घर गाठत त्यांनी दाखवून दिली. हो पण काहीनीं घराच्या अगदी जवळ येवून उष्माघाता मुळे तर काहीनीं बरयाच दिवसांच्या उपासमारी मुळे आपले प्राण सोडले.
     कुणि सायकलीं साठी पैसे मागूवून त्यानी घर गाठायचा प्रयत्न करताहेत कुणि कश्याच्या गाड्यां मधे लपून प्रवास करताहेत काहीनीं अवाजवि भाड देवून घर गाठल ,काहीनां रेल्वे व बस ने घरी पोहचता आल पण अजूनही लाखो आपल्याला आपल्या गावी,घरी कस जाता येईल या विवंचनेत आहेत.
   या काळात करोनाने मरणारया लोकां सोबत त्याच्या मुळे उद्भवलेल्या परिस्थि मुळे अनेकानां आपले प्राण गमवावे लागले.पुढे हे असच किती दिवस चालायच कुणास ठाऊक?
      यात बरयाच लोकांनी जशी पैसे (देणगी स्वरूपात) देवून मदत केली काहीनिं रस्त्याने जाणारयानां जेवण ,पाणी दिल काहीनीं वंचितांना अनेक प्रकारे मदत केली .
   आत्ता प्रश्न असा आहे कि कामाची ठिकाण सोडून गावी जाणारया व इतरही रोजगार बुडालेल्या लोकांचे पुढचे काहि महिने वा वर्ष उदर निर्वाहाच काय?
     खरच बिहार ,उत्तर प्रदेश या राज्या तून येणारा मजूर वर्ग मोठ्टाच आहे त्यानां तिॆथे काम नाहीत म्हणून ते वेगवेगळ्या राज्यात विखूरले भाकरी मिळवण्या साठी किंवा आहे त्या पेक्षा जरा बर आयुष्य जगता याव म्हणून .
       जशी यानां कामाची गरज आहे तशिच त्याच्यां कडून काम करून घेणारया कारखानदार , व्यवसाईक,बिल्डर, रस्त्याच काम करणारे मोठे ठेकेदार किंवा कंपन्या यानांहि त्यांची गरज आहेच .
      मग या लोकानीं या श्रमिकांची काळजी घ्यायला नको होती का?
    ईथे सरकारने योग्य कायदे करून अंमलबजावणि करण्याची गरज आहे .नंतर मोठ्या सवलती , मदतीच्या घोषना करून भ्रष्ट व्यवस्थेला खाण्याची अनेक कुरण उपलबध्द करून देऊन देशाला आर्थिक दृष्टया खड्यात टाकण्या सारखे आहे.
      या बाबतित राज्यांनी तिथेच रोजगार उपलबध्द करूण देणे ,स्थानिक लोकांनाच वेगवेगळे प्रशिक्षण देवून  कुशल कामगार  म्हणून रोजगार देणे हे उपाय आहेतच कि
      पण आजी माजी सरकार एकमेकांवर आरोप करून ब्लेम गेम खेळण्यातच व्यग्र आहे.
      जागतिक स्थरावर एवढी सगळी उलथापालथ झालीय या परिस्धतीत सगळ्यांनि सगळ्यां साठी जीवन कस सुकर होईल या दृष्टीने पावल उचलन गरजेच आहे , स्वत:च्या तिजोरीतली गंगाजळी लोकां साठी उपलबद्ध करून देवून खरा आनंद घेता येतो ही आनंद वा सुखाची नवी संकल्पना रूजवणे गरजेच आहे कारण जगात जर अस विदारक दु:ख असेल तर तुम्ही तरी कसे सुख उपभोगू शकाल?

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल