पंढरीची वारकरी

ऐरवी म्हातारया माणसानां जरा बोलायच असत ,कुणि विचारपूस केली तर ते भरभरून बोलतात.यांच जरा वेगळच होत . त्यांच्या कडे बघून हसल तरी त्या फारसा रिस्पाॅन्स देत नव्हत्या . जनरल डब्बा होता म्हणून अंदाज लावण कठिणच होत कि त्यांची परिस्थीती नेमकी कशि आहे.थंडीचे दिवस होते तेव्हा अगदी गुंडाळून बसल्या होत्या मग मी सवईने बँगेत नेलेली एक शाल त्यांना दिली तर ती त्यांनी सिट खालची वायरची पिशवी काढून त्यात ठेऊन दिली वर चेहरा परत तसाच निर्विकारी.
थोड्या वेळाने चहा वाला आला तर आजींनी त्याला एक चहा मागितला ,त्याने पैस्या साठी हात पुढे करताच मी पैसे देऊ केले तर आजीनीं आपल्या कमरेच्या चंचीतन नोट काढून चहावाल्याचे पैसे दिले. म्हणजे आजीबाई स्वाभीमानी होत्या.
पण अख्या प्रवासात त्या कुणाशीच फारस बोलल्या नाहीत फक्त एकदा मागच्या कंम्पार्टमेंट मधून एक मुलगी त्यांना जागा आहेना म्हणून विचारायला आलि ,त्यांनी तीलाच तेवढ उत्तर दिल.
न राहवून मी त्यांना विचारल कुठे जायचय आजी ,तेव्हा वर्धेला एवढ बोलून म्हातारी गप्प.पुढे मीच परत विचारल इकडे कुठे गेल्या होत्या तर" पंढरपूर "ऐवढी माझ्या प्रश्वाच्या उत्तरा दाखल माहिती मिळाली .
तेवढ्यात माझ स्टेशन आल म्हणून मी खाली उतरले ,इतर वेळी सहप्रवासि निरोप देतात किंवा घेतात पण या पंढरीच्या वारकरयाने माझी दखलही घेतली नाही.
खर
Comments
Post a Comment