प्रेम आणि आई
आत्ताच पाश्चात्यांचा म्हणतात तो मदर्स डे सगळ्यांनी साजरा केला,म्हणजे काहीनीं फक्त स्टेटस ठेवून आपल्या आयुष्यातील आलेल्या मातृतुल्य वा माया करणारया सगळ्या स्रियांचे आभार मानले ,त्यांचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे सांगीतले.
प्रेम आणि आई या दोन गोष्टी खर तर एक दिवस साजरया करणे अवघड पण त्या दिवसाचे औचित्य साधून त्या प्रेमाची जाणिव असल्याचा व त्या व्यक्तींना त्यांच्या त्या प्रेमा साठी ऋण व्यक्त करण्याच्या उद्देषाचे हे छोटे छोटे प्रयत्न सुखावणारे ठरतात.
प्रेम निस्वार्थ प्रेम तुम्ही तिला दिसण्या आधी पासूनचे म्हणजे तिच्या उदरात तुमच्या अस्तीत्वाची चाहूल लागल्या पासून ती तुमच्यावर करत असते.
आई ,मदर,माय, माऊली,अम्मा,अम्मी या कुठल्याही संबोधनाने समोर येणारी आकृती पण प्रेम दर्शवनारीच असते अगदी मदर मेरी च्या कुशितल्या तान्हूल्या लेकरा सोबतची मुर्ती सिबंल आँफ लव.
आयुष्यात एक जन्म देणारी आई असते पण तुमच्या वर माया करणारी अनेक माणस आईच्या मायेने तुमच आयुष्य संमृध्द करत असतात.
कधी ती आजी असते हो कारण इला तर दुधा पेक्षा दुधावरची साय अगदी प्रिय असते अस आपण म्हणतोच .
लहाण पणा पासून ही पण आपल्या वर खुप खुप प्रेम करते कधि कधि ती आपल्याला आई पेक्षा जवळची वाटते कारण तिच्या शिस्तीच्या रेषा आपल्या साठी मोकळ्या असतात. बरयाचदा आपण तिच्या लाडामुळे वाया गेलो अस तिला ऐकवल जात.
कधी ही जागा मावशी घेते कधि काकू .आजकाल मुल आई-वडिलां कडे किंवा होस्टेलवर असतात पण पुर्वि शिक्षणा साठी काका किंवा मावशी कडे राहीलेल्या आमच्या पिढीला मावशी व काकूच ही तितकच प्रेम मिळालय.त्यांच्याशी अगदि चांगल गुळपिट जमलय.शाळेतल्या काॅलेजातल्या अनेक गोष्टी,गुपित त्यांनाच सांगितलीत.
कधि शेजारयांचा पण यात सहभाग असतो म्हणजे आई गावाला गेली किंवा आजारी असली कि शेजारच्या काकू अगदी शाळेच्या वेळा सांभाळून जेवणाची काळजी घेतात कधि कधि आई पेक्षा यानांच तुमचा चेहरा वाचता येतो अस काहीस होत.नविन लग्न झालेल्या पण दोघच राहत असलेल्या जोडीतल्या तिला शेजारी थोडे वयस्कर असतील तर त्यांचा आधारच मिळतो ,स्वयंपाकात त्यांची शिकवण तिला सुगरण करते, त्यांची मुल लांब असतील तर हिच त्यांच्या प्रेमाची अधिकारी होते.आजारपण,सणवार यात त्यांची मायेची साथ तिला लाभत असते आणि ति जेव्हा पहिल्यांदा आई होणार असते तेव्हा हि शेजारी असलेला परकी स्रीच तिची आई होते ,तिच खाणपिण ,तिचे डोहाळे पुरवण ती अगदी मायेन करते कारन रक्ताची माय तर कोसो दूर असते.
कधि सासरची म्हणून बदनाम असलेली नाति ही मायेची सावली होतात अगदी नवरा जवळचा न वाटता या नात्यां कडून भरभरून प्रेम मिळत , जीव लावणारी समजून घेणारी सासू नुस्ती म्हणायला म्हणून नाही तर दुसरी आईच होते. जाऊबाई मोठ्या असतील तर त्यांची ही माया मिळते ,हो तुम्हाला ते मिळवता यायला लेकरू होऊन पोटात शिराव लागत येवढच.
ही नाती तुम्ही जन्म देणारया आई पासून दूर जाता, तिच्या लहाण लेकराच्या भुमिकेतून इतर भुमिकां मध्ये शिरता तेव्हा प्रेमाचा नवा स्रोत होतात.
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्या आईचा पदर सोडलेल्या लेकरांवर मायेची छाया करणारया अनेक लोकांमधे कधि कधि शिक्षकांचाही वाटा असतो.
आपण त्यांच्या साठी किंवा ते आपल्या साठी स्पेशल होतात, गूरूपोर्णिमच्या पलिकडे त्यांच्यात अन आपल्यात काही तरी तयार होत.
या सगळ्यात फक्त स्री पात्रच असतात अस मुळिच नाही.आई ,जन्मदात्री काही कारणानि गमावलेल्या लेकरां साठी बाबा हि आई ची भुमिका निभावतो ,नुसती निभावतोच नाही तर जगतोहि . लेकीची वेणी घालणारा बाप दुर्मिळ असला तरी तो ही अस्तित्वात आहे.
या सगळ्या प्रेमाने भारलेल्या मानवी सोहळ्यात प्राण्यांच्या मातृत्वाचाही ,त्याच्यां प्रेमाचाही उल्लेख होणे गरजेचे ठरते.
मोगलीला सांभाळणारे प्राणि मातृत्वाचा नवा अविष्कार दाखवतात.आपल्या पिलांवर प्रेम करणारारे अनेक प्राणि आपल्याला माहित आहेत पण इतर प्राण्यानां दूध पाजणारे प्राणिही प्रेमाने भरलेले दिसतात.तसच प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे मानव ही आई पणाच्या सीमा ओलांडतानां दिसतात.
खरच किती किती प्रेमाचे ,मातृत्वाचे नजारे पाहिलेत या मदर्स डे ला ,समाज मांध्यमांवर , प्रेम मातृह्रदयी प्रत्येक प्राणिमात्राच दुसरयांवर ज्यात वेगळाच गंध आहे,वेगळाच ओलावा आहे ,वेगळ मनाला सुखावणार ,कंठ दाटून आणनार.

Comments
Post a Comment