सबका साथ सबका विकास

           " ऐक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना" ही उक्ति घरातल्या बाई पासून ,सरकार,आणि जागतिक आरोग्य संघटना(WHO) या सगळ्यानांच लागू होतेय.
    घरातली माणस 24 तास घरात असल्यामुळे सहाजिकच त्यांच्या खाण्या पिण्याच्या गरजा ,त्यांचा डिमांडस्, घरातली इतर काम करत सगळ्यांना खुश ठेवायची तिची कसरत ,तिने कितीही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला तरी तिचा ही संयम सुटतो,एकटीन हे करन आणि घरातल्या इतरांनीही जबाबदारी जाणीव ठेवून आपणहून यात सहभागी होण, फरक पडतोच.
       घरात तिनेच राबायच या पेक्षा प्रत्येकान त्यात सहकार्य केल तर ती करते त्याची जाणीवही होते व त्या कामाच महत्व ही कळत वर सगळ्यांन मधे सहकार्याची भावनादृढ  होते,एकतेने, आनंदाने काम करतांना नाती सुदृढ व्हायला मदतच होते.
      बरयाच लोकांनी WHO  ने करोनाला महामारी घोशीत करायला उशिर केला अस म्हटल आहे तर या संघटनेने त्यावर योग्य उपचार किंवा त्याची साथ रोखन्याच्या उपाय योजनांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने वा योग्य वेळीच केला नाही असही काहींच म्हणन आहे.
      पण ज्या देशांनी कुठलीही जागतीक घोषणा होण्या पूर्विच पुढच संकट लक्षात घेता आपल्या देशात योग्य ते निर्णय घेतले व निर्बध ही घातले.त्याचे परिणाम दिसून आलेत कारण या देशांन मध्ये करोनाला हातपाय पसरवता आले नाहीत.
   देश पातळीवर गोव्याचे उदाहरण वाखाणन्या जोगे आहे. तिथेही परदेशी पर्यटकांची संख्या खुप असते पण तिथल्या मुख्यमंत्र्यानीं आपल्या प्रधानमंत्र्यांशी संवाद साधत योग्य वेळी निर्णय घेतला,तसेच यंत्रणा व नागरीकांच्या सहयोगाने गोवा करोना मुक्त आहे.
    इतर राज्यांना काही बाबतीतले निर्णय घेण्याची मोकळीक केंद्र सरकारने दिली होती,त्यात दक्षीणे कडील राज्यांनी योग्य वेळी आपल्या सीमा बंद केल्या आणि याचे परिणाम म्हणून तिथला करोनाचा प्रसार आटोक्यात येण्यास मदत झाली. तसेच केरळ मध्ये करोना बाधीतांची संख्याही खुप होती पण आरोग्य यंत्रणा , नागरिकांच्या सहयोगानी तिथल्या शासनाला यावर मात करता आली.
    पंतप्रधानांन च्या इतर निर्णया प्रमाणे लाॅकडावून च्या निर्णयावर ही खुप टिका झाली स्पेशली जे लोक आपल्या सामाजीक जाणीवेत फक्त टिकाकाराची भुमिका निभावतात त्याच्यां कडून यावर वेगवेगळे इतर उपाय सुचवले गेले.
   जिथे जागतिक स्थरावर भारताच्या भुमिकेचे कौतुक केले गेले तिथेही हि मंडळी आपल्या राजकारणाच्या वा टिकाकारा च्याच भुमिके चे प्रदर्शन करतानां दिसली.
      यात सरकारचे नागरिकांच्या  खात्यावर दरमहा 500 रू. टाकण्याच्या निर्णयाचे परिॆणाम म्हणजे दारिद्र्य रेशेखालील नागरिकांना त्यांच्या प्राथमिक गरजा काही अंशी पुर्ण करण्यास मदत मिळाली पण तेव्हांच पैसे मिळवण्या साठी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवला .त्यावर उपाय म्हणून पोस्टाने ते पैसे घरपोच देण्यचा निर्णय काही ठिकाणी घेतला व आमलातही आणला तसेच काही ठिकाणी बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम दिली.
     इथे लोकांच्या सवई बघता काही यंत्रणांनी पुढाकार घेतला तर योग्य परिणाम सांधता येतो हे सिध्द होते.
   लाॅकडाउन मुळे रोजगार बुडालेल्या लोकांन साठी बरयाच संस्थांनी व बरयाच दानशूर दात्यांनी शिदा किंवा दोन वेळच जेवण दिल, काहीनीं मास्क आणि सॅनिटायझर देखिल पुरवले अगदी फोटो काढून का होइना अशीच बरीच मदत केली.
       यात पोलीस , डाॅक्टर्स ,मेडीकल स्टाफ,सफाई कर्मचारी ,तसच वेगवेगळ्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणारे हजारो लाखो हाथ कामाला लागलेत ,अजूनही जीव धोक्यात घालून ते 24 तास आँन ड्युटि कार्यरत आहेत .यांच्या मदतीला आत्ता माजी सैनिकही बेजबाबदार पणे वागणारया लोकांना आवर घालायला आपल्या रिटायर मेंट नंतरही देशा साठी बांधीलकी म्हणून रस्त्या वर उतरलेत.
     हि सगळीच देश व समाजा प्रती असलेल्या जबाबदारीत आपला वाटा उचलत आहेत .
    आत्ता आपली जबाबदारी काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणे गरजेचे आहे स्पेशली जे लोक सरकारच्या पर्यायाने मोदीच्या कुठल्याही निर्णयाला नाव ठेवणेच आपल सामाजीक प्रबोधनाच काम समजतात.  असतील काही निर्णय सामान्य माणसा साठी त्रास दायक ठरलेले म्हणून सगळच चुकीच कस असेल आणि जागतीक स्थरावरही काय माध्यम मोदी सरकारच्या दबावा खाली त्यांच कौतुक करत असतील.
    असो! तर मी भारताचा जबाबदार नागरीक म्हणून काय करतोय? इतरांच सोडाच पण मी माझ्या पुरते तरी कायदे पाळतोय काय ? माझ्या घरात कमी पडू नये म्हणून वस्तूचा गरजे पेक्षा जास्त साठा करतोय,सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवून दूकानात गर्दी करतोय? (यात काहीं म्हणतील की ठराविक वेळेच बंधन म्हणून अस करतात,पण ज्यानां सरकारला नाव ठेवायच कळत ते स्वत: पुढाकार घेवून स्वत: बरोबर इतरांना  वळन का लावत नाहीत?)
   "दारू साठी तर काय पण"याचा प्रत्यय आपल्या जाणत्या लोकांनी तर दिलाच आहे हे तर सगळ्यांना दिसल पण ही बंदी उठायच्या आधी ही लोकानीं ती मिळवली नसेल कशा वरून ,काही दारू तस्करीची प्रकरण समोर आलीत पण बरेच  घसे या आधीही नकोत्या मार्गाने" ती " मिळवून ओले झालेच असणार.
    तर इथेही मी काय कराव हे न बघता यांनी काय कराव वा करायला हव येवढच रंवथ करण चालू असत.
      कुठेही फक्त सरकार सगळच बदलू शकत नाही आणि आपल्या कडे कायदेही फारशे कडक नाहीत ,पळवाटाच जास्त त्या मुळे साधी वेळ ही न पाळू शकणारे( भारतीय वेळेनुसार) म्हणजे लेट होण किंवा करण आपल्या सवइचा भाग माननारे स्वात: ला शिस्त कधी लावणार ? हा माझा सगळ्यानांच प्रश्न आहे.
           मला सेवा देणारया कुठल्याही वर्गाला मी योग्य मोबदला देतोय/देतेय का? तरच मी गरीबां साठी सरकारने  काय करावे हे सुचवाव.
      मी माझ्या पुरता जातीवाद किंवा धर्मवाद मिटवला आहे काय? फक्त समाजातच नाही पण वैयक्तीक आयुष्यात सगळे माझ्या साठी समान आहेत का? हा प्रश्न स्वत:ल विचारूनच राजकारण्याच्या जाती वा धर्मवादाला दोष द्यावा.
     टॅक्स भरतानां मी प्रामाणिक पणे तो भरतोय का?
नियम मग ते वाहतुकीचे किंवा सार्वजनिक स्वच्छतेचे किंवा प्रदुषणा संबधीचे असोत मी ते पाळतोय का?
    मी सक्षम असूनही इतर गरजू लोकांसाठीच्या योजनांचा लाभ घेतोय का?
  असे अनेक प्रश्न स्वत: ला विचारा आणि प्रामाणिक पणे मी जर अमेरीकेचा वा इतर शिस्त पाळणारया देशाचा नागरीक असतो तर असच वागलो असतो का? याचही उत्तर स्वत: लाच दया म्हणजे आत्मपरिक्षण करा आणि तरच कळेल की कुठलीही लढाई जिंकण्या साठी प्रत्येकाला सैनिक व्हाव लागत ते अगदीच बार्डवर नाही तर तो आहे तिथेच प्रामाणिक पणे त्यान त्याच कर्तव्य करण गरजेच असत.
     म्हणूनच आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली असतांना सगळ्यानीं साथ दिलीतरच सबका विकास साधता येईल.
 



Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल